रेल्वे मराठवाड्याला, पण फायदा कुणाला? तिरुपती दर्शनाचा मार्ग खडतर, नेमका काय झालाय गोंधळ?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Railway Update: मराठवाड्यातून तिरुपती दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. पण, रेल्वेच्या निर्णयाने भाविकांची गैरसोय होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : तिरुपतीला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, मराठवाड्यातून जाणाऱ्या यात्रेकरूंना योग्य रेल्वे सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. दक्षिण मध्य व दक्षिण रेल्वे मंडळाने दक्षिण भारतातील प्रवाशांवर भर देत अनेक सोयीच्या गाड्या चालवल्या असल्या, तरी मराठवाड्यातील भाविकांसाठी आवश्यक ते नियोजन होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
चेन्नई–नगरसोल रेल्वे हीसुद्धा मुख्यतः शिर्डीमार्गे जाणाऱ्या भाविकांचा विचार करूनच चालवली जाते. नव्याने जाहीर झालेली तिरुपती–श्रीसाईनगर शिर्डी विशेष गाडी शिर्डीला पोहोचते, पण परतीचा प्रवास काही तासांतच असल्याने शिर्डीत मुक्कामाची गरज राहत नाही. अशाच पद्धतीने तिरुपतीकडून मराठवाड्याला थेट आणि सोयीची रेल्वे असावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
advertisement
तिरुपतीत दर्शनासाठी किमान 24 तासांचा वेळ राखून ठेवावा लागतो. काही वेळा दर्शनाची प्रतीक्षा सहा ते सात तासांपर्यंत वाढते. त्यामुळे रेल्वे तिरुपतीत पोहोचल्यावर किमान एक दिवस भाविकांकडे मोकळा वेळ असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. परंतु सध्याच्या वेळापत्रकात त्याची पूर्तता होत नाही.
छत्रपती संभाजीनगरकरांना अपुरा कोटा
नवीन गाड्या सुरू करताना दक्षिण भारतीय प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवले जाते. शिर्डी, मनमाड व नगरसोल येथे मोठा कोटा राखला जातो; परंतु संभाजीनगरला केवळ 40–45 जागा मिळतात. त्यामुळे तिरुपतीला जाण्यासाठी जागा मिळणे कठीण ठरते आणि परतीच्या प्रवासासाठी वेटिंग 24 तासांपासून अधिक असते.
advertisement
तिरुपतीहून छत्रपती संभाजीनगरसाठीची वेळ
शनिवारी रामेश्वर ओखा सकाळी 11.20 वा. निघून छत्रपती संभाजीनगरला रविवारी 9.55 वा. पोहोचते.
तिरुपती छत्रपती संभाजीनगर शनिवारी रात्री 10.55 वा. निघते व रविवारी रात्री 10.40 वाजता पोहोचते.
तिरुपतीसाठी छत्रपती संभाजीनगरहून रेल्वे
छत्रपती संभाजीनगर तिरुपती शुक्रवारी रात्री 8.50 वा. निघते. शनिवारी सायंकाळी 8.30 वा. तिरुपतीला पोहोचते.
ही गाडी सोमवारी दु. 2.50 वा. निघते व तिरुपतीला मंगळवारी दुपारी 12.30 वा. पोहोचते.
advertisement
शिर्डी-तिरुपती छत्रपती संभाजीनगरहून रात्री 1.15 वा. निघून तिरुपतीला बुधवारी रात्री 1.30 वा. पोहोचते.
रविवारी सकाळी 4 वा. निघून सोमवारी स. 6.15 वा. पोहोचते.
रविवारी चेन्नई नगरसोल सकाळी 11.35 वाजता निघून सोमवारी सकाळी 9.55 वाजता पोहोचते.
ही व्यवस्था मुख्यतः दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांना शिर्डी दर्शन करून एकाच दिवसात परतण्याची सोय उपलब्ध करून देते.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 12, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रेल्वे मराठवाड्याला, पण फायदा कुणाला? तिरुपती दर्शनाचा मार्ग खडतर, नेमका काय झालाय गोंधळ?










