advertisement

एक्सप्रेसवेवर 30 तासांचा थरार! हजारो प्रवाशांसोबतच बडे उद्योगपतीही अडकले कोंडीत, 8 तासानं 'एअरलिफ्ट'

Last Updated:

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाल्यामुळे निर्माण झालेली महाकोंडी केवळ सर्वसामान्यांसाठीच नाही, तर बड्या उद्योगपतींसाठीही चिंतेचा विषय ठरली आहे

बडे उद्योगपतीही अडकले कोंडीत
बडे उद्योगपतीही अडकले कोंडीत
पुणे: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी झाल्यामुळे निर्माण झालेली महाकोंडी केवळ सर्वसामान्यांसाठीच नाही, तर बड्या उद्योगपतींसाठीही चिंतेचा विषय ठरली आहे. सलग ३० तास ठप्प असलेल्या या महामार्गावर सुमारे २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याच कोंडीत पिनॅकल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुधीर मेहता तब्बल ८ तास अडकून पडले होते. अखेर त्यांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टर पाचारण करावे लागले.
८ तासांच्या कोंडीनंतर 'एअरलिफ्ट'
डॉ. सुधीर मेहता (प्रमुख, EKA मोबिलिटी आणि पिनॅकल इंडस्ट्रीज) पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना या भीषण कोंडीत अडकले. तासनतास वाट पाहूनही मार्ग मोकळा होत नसल्याने, एविएशन कन्सल्टंट नितीन वल्डे यांच्या मदतीने त्यांना हेलिकॉप्टरद्वारे 'एअरलिफ्ट' करून सुरक्षितपणे पुण्यात पोहोचवण्यात आले. या घटनेनंतर मेहता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एक्सप्रेसवेवरील विदारक परिस्थितीचे फोटो शेअर करत प्रशासकीय त्रुटींवर बोट ठेवले.
advertisement
advertisement
प्रशासकीय अपयशावर ओढले ताशेरे
"हजारो प्रवासी, लहान मुले आणि वृद्ध अन्नापाण्याविना अडकले आहेत, पण त्यांच्या सुटकेसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही," अशी खंत डॉ. मेहता यांनी व्यक्त केली. त्यांनी प्रशासनाकडे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. एक म्हणजे इमर्जन्सी एक्झिट, एक्सप्रेसवेवर ठराविक अंतरावर आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग असावेत, जेणेकरून अशी स्थिती उद्भवल्यास वाहने वळवता येतील. तर दुसरी म्हणजे हेलिपॅडची निर्मिती, आपत्कालीन रेस्क्यूसाठी महामार्गाच्या कडेला कमी खर्चात हेलिपॅड्स उभारण्यात यावेत. अशी मागणी त्यांनी केली.
advertisement
सर्वसामान्यांचे अतोनात हाल
टँकरमधील गॅस गळती थांबवताना एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाची दमछाक झाली. मात्र, या काळात लहान मुलं आणि आजारी माणसांना जो मनस्ताप सहन करावा लागला, तो भीषण होता. उद्योगपतींना हेलिकॉप्टरने बाहेर पडता आले, पण 'हजारो सर्वसामान्यांचं काय?' हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
एक्सप्रेसवेवर 30 तासांचा थरार! हजारो प्रवाशांसोबतच बडे उद्योगपतीही अडकले कोंडीत, 8 तासानं 'एअरलिफ्ट'
Next Article
advertisement
Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलि
  • माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना

  • कांदिवली परिसरात एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार

  • समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे.

View All
advertisement