advertisement

Mumbai Local : मुंबईकर लोकलच्या तिकिटासाठी रांगेत का उभं राहताय? रेल्वेचा मास्टर प्लॅन, कटकट कायमची मिटणार

Last Updated:

Mumbai Local Tickets : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जिथं ट्रेन तिकीट काढणं आता प्रवाशांना सोयीस्कर ठरणार आहे.

Western Railway digital ticket booking system
Western Railway digital ticket booking system
मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी लोकल तिकीट खरेदी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यात मुंबई उपनगरीय रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी तिकीट खरेदीची प्रक्रिया आता अधिक जलद आणि सोपी होणार आहे. नेमकी कोणती सोय प्रवाशांसाठी करण्यात येणार आहे ते पाहणे उत्सुकतेचे राहिल.
तिकिट रांगेतून प्रवाशांची कायमची सुटका
लोकल ट्रेनही मुंबई सह उपनगरातील नागरिकांचे दररोज प्रवास करण्याचे एक मुख्य साधन आहे. लोकल ट्रेन प्रवास करताना बरेजजण मासिक पास काढतात तर काहीजण तिकीट रांगते उभं राहून दररोज तिकीट खरेदी करतात. मात्र अनेकदा प्रवाशांची तिकीट खरेदीसाठी भलीमोठी रांग लागलेली असते त्यामुळे वेळ आणि त्रास दोन्ही प्रवाशांना सहन करावा लागतो.
advertisement
तिकीट काढणं होणार 'स्मार्ट'
प्रवाशांच्या सोयाची विचार करुन पश्चिम रेल्वेच्या स्थानक परिसरात एकूण 325 नवे स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र (ATVM)सुरु करण्यात येत आहेत. या आधुनिक यंत्रांमुळे प्रवाशांना काही सेकंदांत तिकीट मिळणार असून डिजिटल पेमेंटद्वारे पैसे भरण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.
सध्या पश्चिम रेल्वेमध्ये 501 एटीव्हीएम कार्यरत आहेत.110 मशिन जुनी झाल्याने ती काढून टाकून त्याऐवजी नवी मशिन बसवली जाणार आहेत आणि बाकीचे मशिन स्थानकांतील नव्या ठिकाणी हलवण्यात येणार आहेत. तिकीट खिडक्यांजवळच नव्हे तर पादचारी पुलांवरही ही यंत्रे उपलब्ध असतील.
advertisement
'या' द्वारे खरेदी करता येणार तिकीट
प्रवासी यूपीआय, डेबिट कार्ड आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे तिकीट काढू शकतील. यासोबतच रेल्वे प्रशासनाने रेल वन मोबाइल अ‍ॅप सुरू केले असून त्याद्वारे स्मार्टफोनवरून थेट तिकीट खरेदी करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत होऊन प्रवाशांचा त्रास कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : मुंबईकर लोकलच्या तिकिटासाठी रांगेत का उभं राहताय? रेल्वेचा मास्टर प्लॅन, कटकट कायमची मिटणार
Next Article
advertisement
Parth Pawar Land Scam: सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी अपडेट
सरकारच्या चौकशीत पार्थ पवारांना क्लीन चीट, मग दोषी कोण? मुंढवा जमीन गैरव्यवहार प
  • मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील खारगे समितीच्या अहवालातील काही मुद्दे समोर आले आहे

  • दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला

  • खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना 'क्लीन चिट' मिळाल्याचे जवळपास स्पष्ट

View All
advertisement