advertisement

Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक

Last Updated:

Mumbai News: माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मुंबईतील कांदिवली परिसरात समोर आली आहे.

मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई: माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना मुंबईतील कांदिवली परिसरात समोर आली आहे. एका मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली समता नगर पोलिसांनी एका नराधमाला अटक केली आहे. संजय एम. गौड असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या या विकृत कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी एका उघड्या गटारात आरोपी मादी कुत्र्यावर अत्याचार करत होता. यावेळी कुत्र्याच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून गेले. नागरिकांनी आरोपीला रंगेहाथ पकडले आणि तातडीने प्राणी कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. PETA इंडिया आणि मार्मिक अ‍ॅनिमल वेल्फेअर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. स्थानिकांनी यावेळी आरोपी गौडाचा लैंगिक छळ करतानाचा व्हिडीओ शूट केला.
advertisement

कायदेशीर कारवाई आणि कलमे

प्राणी कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्यानंतर समता नगर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी एफआयआर (FIR) दाखल केला. आरोपी संजय गौड याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३२५ आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० च्या कलम ११(१)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांत या परिसरात प्राण्यांवरील अत्याचाराची ही दुसरी घटना असल्याने प्राणीमित्रांनी चिंता व्यक्त केली आहे.
advertisement

जखमी श्वानावर उपचार सुरू

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मादी कुत्र्याला तात्काळ उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या या मुक्या जिवावर उपचार सुरू असून तज्ज्ञ डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबई हादरली! उघड्या गटारात कुत्र्यावर अत्याचार, स्थानिकांनी रंगेहाथ पकडलं, पोलिसांकडून अटक
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement