Friday Releases : शुक्रवारी थिएटर आणि ओटीटीवर फुल ऑन एंटरटेनमेंट, रिलीज झाल्यात 11 फिल्म आणि सीरिज
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Friday Releases OTT and Theater : डिसेंबरचा तिसरा शुक्रवार अर्थात 19 डिसेंबरला थिएटर आणि ओटीटीवर ड्रामा, थ्रिलर, स्पोर्ट्स, रोमान्स, थरार अशा विविध जॉनरच्या फिल्म आणि सीरिज रिलीज झाल्या आहेत.
advertisement
अवतार: फायर अँड अ‍ॅश (Avatar: Fire and Ash) : जेम्स कॅमेरून यांचा 'अवतार: फायर अँड अ‍ॅश' थिएटरमध्ये रिलीज होण्यास सज्ज आहे. हा चित्रपट जगभरासह भारतातही 19 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. पँडोरावर घोंघावणाऱ्या संकटाची कथा सॅम वर्थिंग्टन, झोई सल्डाना आणि स्टीफन लँग त्यांच्या पात्रांमधून कशी पुढे नेतात, याचा उलगडा या साय-फाय फिल्ममध्ये होणार आहे.
advertisement
आशा (Asha) : ‘आशा’ या चित्रपटात महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू. रिंकूने साकारलेली 'आशा' ही फक्त आरोग्य यंत्रणेतील एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. 19 डिसेंबर 2025 रोजी ही मराठी फिल्म थिएटरमध्ये रिलीज झाली आहे.
advertisement
रात अकेली है: द बंसल मर्डर्स (Raat Akeli Hai: The Bansal Murders) : नवाजुद्दीन सिद्दीकी यांची रात अकेली है: द बंसल मर्डर्स ही सीरिज ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. या सीरिजमध्ये नवाजुद्दीनसोबत चित्रांगदा सिंह आणि राधिका आपटे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. कानपूरमधील बंसल कुटुंबाच्या हत्या प्रकरणाची उकल करण्याची जबाबदारी जतिन यादववर असते. तपास जसजसा पुढे जातो, तसतसे लालच, फसवणूक आणि अनेक गुप्त दुवे उघड होतात. 19 डिसेंबरपासून ही क्राइम थ्रिलर सीरिज प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर (Netflix) पाहता येईल.
advertisement
फोर मोअर शॉट्स प्लीज – सीझन 4 (Four More Shots Please – Season 4) : चार मैत्रिणींच्या वैयक्तिक आयुष्यातील गुंतागुंत पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बानी जे, मानवी गगरू, कीर्ती कुल्हारी आणि सयानी गुप्ता पुन्हा एकदा रोमँटिक कॉमेडी-ड्रामा घेऊन परतत आहेत. 19 डिसेंबरपासून ही रोमँटिक कॉमेडी फिल्म प्रेक्षकांना प्राइम व्हिडिओवर (Prime Video) पाहता येईल.
advertisement
द ग्रेट फ्लड (The Great Flood) : कोरियन सीरिज पाहण्याची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी नेटफ्लिक्सने आणली आहे एक नवीन साय-फाय फिल्म. यात किम दा-मी, पार्क हे-सू आणि क्वोन युन-सियांग प्रमुख भूमिकेत आहेत. कथा एका AI संशोधकाची आहे. ज्याच्याकडे मानवजातीच्या भविष्याची किल्ली आहे. एका विनाशकारी पुरामुळे संपूर्ण जग उद्ध्वस्त होते आणि काही लोक एका इमारतीत अडकतात. कथा त्यांच्या जगण्याच्या संघर्षावर आधारित आहे.
advertisement
ह्युमन स्पेसिमेन्स (Human Specimens) : ह्युमन स्पेसिमेन्स ही कानाए मिनाटो यांच्या कादंबरीवर आधारित जपानी सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. ही कथा प्रोफेसर शिरो सकाकी यांच्या फुलपाखरांवरील संशोधनाभोवती फिरते. तो आपल्या मुलासह सहा तरुण मुलांना कसे ‘ह्युमन स्पेसिमेन्स’मध्ये बदलतो हे या सीरिजमध्ये सविस्तर दाखवले आहे. 19 डिसेंबरपासून प्रेक्षकांना ही सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज प्राईम व्हिडीओवर पाहता येईल.
advertisement
advertisement
डॉमिनिक अँड द लेडीज पर्स (Dominic and the Ladies’ Purse) : या कॉमेडी मिस्ट्री थ्रिलर चित्रपटाची कथा एका माजी पोलीस अधिकाऱ्याची आहे, जो आता खासगी गुप्तहेर डॉमिनिक बनतो. तो एका साध्या पर्सचा शोध घेण्याचे प्रकरण स्वीकारतो, पण हळूहळू तेच प्रकरण एका खुनाच्या रहस्यात बदलते. या मल्याळम चित्रपटात ममूटी प्रमुख भूमिकेत आहेत. 19 डिसेंबरपासून ही मिस्ट्री कॉमेडी ZEE5 वर ओटीटी लवर्स पाहू शकतात.
advertisement
दुर्लभ प्रसाद की दुसरी शादी (Durlabh Prasad Ki Dusri Shaadi) : बनारसच्या घाटावर बसून बनारसी अंदाज दाखवणारे संजय मिश्रा आणि महिमा चौधरी यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आहे. संजय मिश्रा यांच्या दुसऱ्या लग्नाची कथा असून, त्यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी मिळत नाही, आणि त्यामागचे कारण स्वतः संजय मिश्रा असतात. आज 19 डिसेंबरला हा विनोदी चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
advertisement
सितारों के सितारे (Sitaron Ke Sitare) : आमिर खान या वर्षी दुसऱ्यांदा मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज आहेत. त्याचा सितारों के सितारे हा चित्रपट 19 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात आमिर खान आपल्या चित्रपटातील खऱ्या नायकांच्या पालकांची कथा दाखवणार आहेत. 19 डिसेंबरला प्रेक्षकांना हा स्पोर्ट्स ड्रामा थिएटरमध्ये पाहता येईल.









