Summer Drink : उन्हाळ्यात नक्की प्या थंडगार बाजरीची राब! त्वचा, केस आणि पोटासाठीही फायदेशीर; पाहा रेसिपी
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Summer special drink bajarichi raab : तुम्ही कधी बाजरीची राब प्यायली आहे का? ही पारंपरिक राजस्थानी रेसिपी आहे. बाजरीची राब उन्हाळ्यासाठी एक अत्यंत फायदेशीर आणि रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. ही रेसिपी कशी बनवायची चला पाहूया.
मुंबई : उन्हाळा सुरु झाला की आपल्याकडे वेगवेगळ्या थंड पेयांची सरबत्ती सुरु होते. मसाला ताक, कैरीचं पन्ह, वेगवेगळी सरबतं.. यांची रेलचेल असते. पण तुम्ही कधी बाजरीची राब प्यायली आहे का? ही पारंपरिक राजस्थानी रेसिपी आहे. बाजरीची राब उन्हाळ्यासाठी एक अत्यंत फायदेशीर आणि रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. ही रेसिपी कशी बनवायची चला पाहूया.
बाजरीची राब आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण त्यामध्ये भरपूर फायबर असतात, ती ग्लूटेन-फ्री आहे, मधुमेहासाठी फायदेशीर आहे, उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते, आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. ही रेसिपी manisha.bandal या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली गेली आहे.
थंडगार बाजरीची राब बनवण्यासाठी लागणारं साहित्य..
- बाजरीचं पीठ
advertisement
- 1 कप दही
- 2 ग्लास ताक
- कोथिंबीर
- हिरवी मिरची
- जिरेपूड
- तेल
- कढीपत्ता
- हिंग
- मोहरी
थंडगार बाजरीची राब बनवण्याची सोपी पद्धत..
- सर्वात आधी दही आणि ताक एकत्र करून घुसळून घ्या.
- त्यामध्ये भाजलेलं बाजारीच पीठ टाकून एकत्र करा.
- आता यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि जिरे पूड टाकून सर्व एकत्र करा.
advertisement
- आता एका तडक पॅनमध्ये तूप टाकून गरम करा.
- तुपामध्ये मोहरी, हिंग आणि कढीपत्ता टाकून तडका द्या.
- हा तडका सरळ दही-ताकाच्या मिश्रणात टाका.
advertisement
तर ही खास बाजरीची राब एकदा नक्की बनवून पाहा. या उन्हाळ्यात ही रान तुमच्या शरीराला नक्कीच थंडावा देण्याचं काम करेल. मुलांसाठीही ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 6:01 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
Summer Drink : उन्हाळ्यात नक्की प्या थंडगार बाजरीची राब! त्वचा, केस आणि पोटासाठीही फायदेशीर; पाहा रेसिपी









