कोल्हापूरात पोटच्या पोरानं आईबापाला संपवलं, हाताच्या नसा कापल्या अन्... पोलिसांच्या पायाखालची जमीनच हादरली!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kolhapur Crime Son Murders Parents : संशयीत आरोपीने आधी आईच्या हाताच्या नसा कापल्या, तसेच चेहऱ्यावर देखील चाकूने सपासप वार केले. यावेळी पुढच्या खोलीत असलेल्या वडिलांना हा प्रकार लक्षात आला नाही.
Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली असून, रक्ताच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. कोल्हापुरातल्या हुपरी परिसरातील सूर्या कॉलनीमध्ये शुक्रवारी पहाटे 5 च्या सुमारास ही भयानक घटना घडली. ज्या मुलाने वृद्धापकाळात आई-वडिलांचा आधार बनायला हवे होते, त्यानेच त्यांचे आयुष्य संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आई-वडिलांच्या डोक्यात गंभीर वार करून हत्या
या घटनेतील आरोपीचे नाव सुनील नारायण भोसले (वय ४५) असून, त्याने स्वतःच्या राहत्या घरी ७५ वर्षीय वडील नारायण गणपतराव भोसले आणि ६५ वर्षीय आई विजयमाला नारायण भोसले यांची हत्या केली. आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी घरातील विळी, काच आणि लाकडी दांडक्याचा वापर केला. या वस्तूंच्या साहाय्याने त्याने आई-वडिलांच्या डोक्यात गंभीर वार करून त्यांचा निर्घृण खून केला.
advertisement
आई कुठे आहे रे...
संशयीत आरोपीने आधी आईच्या हाताच्या नसा कापल्या, तसेच चेहऱ्यावर देखील चाकूने सपासप वार केले. यावेळी पुढच्या खोलीत असलेल्या वडिलांना हा प्रकार लक्षात आला नाही. आई कुठे आहे रे... म्हणून विचारणा केली असता मागं आहे जावा.. म्हणून सांगत वडिलांना पाठीमागून डोक्यात काठीने हल्ला केला. तसेच वडिलांच्या हाताच्या शिरा कापून टाकल्या. त्यात वडिलांचा देखील जीव गेला.
advertisement
पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला अन्...
धक्कादायक बाब म्हणजे, हे अघोरी कृत्य केल्यानंतर आरोपी सुनील स्वतःहून हुपरी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पहाटेच्या शांततेत घडलेल्या या प्रकारामुळे आजूबाजूचे नागरिक सुन्न झाले आहेत. घरगुती वाद किंवा अन्य कोणत्या कारणातून ही हत्या झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरात पोटच्या पोरानं आईबापाला संपवलं, हाताच्या नसा कापल्या अन्... पोलिसांच्या पायाखालची जमीनच हादरली!











