Pune Weather : पुणेकरांनो तयार राहा! हवामानात अचानक होणार हा मोठा बदल; IMD चा नवा अंदाज

Last Updated:

कडाक्याच्या थंडीची जागा आता अंशतः ढगाळ हवामान आणि वाढलेले तापमान घेणार आहे. त्यामुळे ख्रिसमसच्या काळात पुण्यात फारसा कडाका जाणवणार नाही, अशी चिन्हे आहेत.

पुणे हवामान बदल (फाईल फोटो)
पुणे हवामान बदल (फाईल फोटो)
पुणे: गेल्या काही दिवसांपासून हुडहुडी भरवणाऱ्या कडाक्याच्या थंडीतून पुणेकरांची आता काहीशी सुटका होणार आहे. शहराच्या किमान तापमानात येत्या दोन ते तीन दिवसांत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे. यामुळे थंडीचा जोर ओसरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
तापमानातील चढ-उतार
रविवारी (२१ डिसेंबर) पुण्यात ८.४ अंश सेल्सिअस इतक्या निचांकी किमान तापमानाची नोंद झाली होती. ज्यामुळे सकाळच्या वेळी शहरात चांगलाच गारठा होता. मात्र, कमाल तापमान २८ अंशांपर्यंत खाली आल्याने दिवसाही हवेत कोरडा गारवा जाणवत होता. आता हवामानात बदल होत असून, सोमवारपासून (२२ डिसेंबर) किमान तापमानात २ अंशांची वाढ होऊन ते १० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
advertisement
पुढील आठवड्याचा अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सोमवारी आकाश मुख्यतः निरभ्र असेल, परंतु दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. सकाळी काही भागात विरळ धुके पडण्याची शक्यता असून कमाल तापमान २९ अंशांपर्यंत पोहोचेल. बुधवारपासून (२४ डिसेंबर) थंडीचा प्रभाव अधिकच कमी होईल. यावेळी किमान तापमान १२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असून, आकाश स्वच्छ राहील. थोडक्यात कडाक्याच्या थंडीची जागा आता अंशतः ढगाळ हवामान आणि वाढलेले तापमान घेणार आहे. त्यामुळे ख्रिसमसच्या काळात पुण्यात फारसा कडाका जाणवणार नाही, अशी चिन्हे आहेत.
advertisement
पुण्यानं 10 वर्षाचा थंडीचा रेकॉर्ड मोडला
पुण्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला असून, एका दशकानंतर प्रथमच पुणेकरांना डिसेंबर महिन्यात सलग सात दिवस एकेरी अंकातील किमान तापमानाचा अनुभव येत आहे. शहरात 2015 नंतर पहिल्यांदाच अशी सलग आणि तीव्र थंडीची लाट नोंदवली गेली आहे. गेल्या सहा-सात दिवसांपासून किमान तापमान सातत्याने 7 ते 9 अंश सेल्सिअसदरम्यान राहिले असून, 20 डिसेंबर रोजी ते 6.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. हे तापमान या हिवाळ्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ठरले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Weather : पुणेकरांनो तयार राहा! हवामानात अचानक होणार हा मोठा बदल; IMD चा नवा अंदाज
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement