रेल्वेच्या तिकीटासाठी मोजावे लागणार जास्त पैसे, मुंबई ते नागपूर अन् नाशिक ते दिल्ली इथे पाहा संपूर्ण डिटेल्स
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रेल्वे तिकीट दरात 26 डिसेंबरपासून प्रति किमी 1 ते 2 पैसे वाढ, 215 किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी लागू. मुंबई, दिल्ली, सोलापूरसह अनेक मार्ग महागले. वर्षात दुसरी दरवाढ.
बसपेक्षा रेल्वेनं जाणं केव्हाही सोयीचं वाटतं आणि पैशांच्या दृष्टीनंही खिशाला परवडणारं असतं. जिथे बस पोहोचत नाही तिथे अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये रेल्वे जाते, त्यामुळे रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. रेल्वेनं प्रवास करत असाल तर तुम्हाला तिकीटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
advertisement
advertisement
215 किमीपेक्षा जास्क प्रवास करत असेल तर त्यासाठी प्रत्येक किमीमागे 1 पैसे वाढ होणार आहे. ही दरवाढ जनरल तिकीटासाठी असेल, तर नॉन एसी गाड़्यांसाठी 2 पैसे वाढ होणार आहे. उदा. छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अंतर 373 किमी आहे तर नॉन एसीसाठी 8 रुपये वाढ होईल. देवगिरी एक्सप्रेसचं तिकीट ६६३ असेल तर ६७० ते ६७१ रुपयांपर्यंत होईल.
advertisement
advertisement
advertisement









