Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या विमान अपघाताचा मोठा पुरावा हाती? धावपट्टीजवळचा नवा VIDEO समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
बारामतीच्या विमानतळावर खासगी विमानासाठी प्रशिक्षण दिलं जातं, यावेळी लावण्यात आलेल्या एका कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामुळे रोज नवनवीन खुलासे होत आहे. हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा आतापर्यंत विरोधक आरोप करत होते. आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून सखोल चौकशीची मागणी केली आहे. यावेळी विमान अपघाताच्या वेळीचा एक नवीन व्हिडीओ सुद्धा समोर आणला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल एक सादरीकरण करून विमान कंपनीवर गंभीर आरोप केले आहे. यावेळी बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ अजितदादांच्या विमानाला कशा प्रकारे अपघात झाला, याचा व्हिडीओ सुद्धा दाखवला आहे.
या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, विमानतळाच्या धावपट्टीवर मोठ्या प्रमाणात धुकं साचले आहे. विमान हे धावपट्टीच्या बाजूला कोसळलं होतं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाला दिसून येत आहे. विमानाचा स्फोट झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
advertisement
लाईव्ह |📍मुंबई | पत्रकारांशी संवाद |🗓️10-02-2026 https://t.co/9XAKinUZZx
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2026
"धावपट्टीच्या बाजूला एक लाईन दिसत आहे, त्यानंतर स्फोट झाला, ती लाईन काय आहे, आग आहे का, हे बघावे लागणार आहे. धावपट्टीवर ५ किमी पेक्षा कमी दृश्यमानता होती पण तरी सुद्धा विमानाचं लँडिंग का करण्यात आलं होतं, असा सवाल यावेळी रोहित पवार यांनी उपस्थितीत केला.
advertisement
बारामतीच्या विमानतळावर खासगी विमानासाठी प्रशिक्षण दिलं जातं, यावेळी लावण्यात आलेल्या एका कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
'हा अपघात नाही घातपात'
"हा अपघात होता का घात होता तर आमची शंका आहे की हा घात होता. जी जी माहिती आमच्याकडे आले त्यावरून मी कुणावर शंका घेत आहे असे नाही. बराच राज्यात ती कंपनी काम करते तीने चुकीची माहिती दिली आहे. आमचा सरकार किंवा कुणावर आरोप नाही. पण सीआयडीला ही अथॅारीटी नाही. गुजरातला ब्लॅक बॅाक्सचे बोलणे सांगितले नाही, पण आमचे म्हणजे आहे की कुटुंबातील कुणाला तरी ते संभाषण एकले जावे आम्हाला त्यांना सांगायचे आहे. राजकीय दृष्टीकोणातून नाही पण व्यवहारीक दृष्टीने काही गोष्टी दाबल्या जात आहे असे आम्हाला वाटते. संथ गतीने जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला तपासात इट्रेन्स नाही, असे म्हणावे लागले. वीएसआर कंपनीच्या सर्व्हिस बंद कराव्यात" अशी मागणी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 9:43 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या विमान अपघाताचा मोठा पुरावा हाती? धावपट्टीजवळचा नवा VIDEO समोर










