Nagar Parishad Election: एकनाथ शिंदेंनी विजयाचं गणित मांडलं, फडणवीसांकडून १२ तासांत हिशेब चुकता
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nagar Parishad Election Results: महायुतीत भक्कम स्ट्राईक रेट कुणाचा? यावरून शिवसेना भाजपमध्ये चुरस आहे.
नागपूर : राज्यभरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीला मोठे यश मिळाले असून, भाजपाने शतक करीत नंबर एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे, तर शिवसेनेने अर्धशतक करीत नंबर दोनचा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे.
महायुतीत भक्कम स्ट्राईक रेट कुणाचा? यावरून शिवसेना-भाजपमध्ये चुरस आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्ट्राईक रेटच्या दाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
फडणवीसांकडून १२ तासांत हिशेब चुकता
राज्यातील क्रमांक एकचा पक्ष भाजप ठरला असून निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. गेल्या ३० वर्षात भाजपचे यंदा सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. जवळपास ३ हजाराहून अधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले. तसेच सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट भाजपचा आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा आमचाच स्ट्राईक रेट अधिक असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले. ते नागपुरात बोलत होते.
advertisement
स्ट्राईक रेटवर बोलताना एकनाथ शिंदे काय म्हणाले होते?
शिवसेना केवळ ठाणे किंवा मुंबईपुरती मर्यादित असल्याचा आरोप शिंदे यांनी फेटाळून लावला. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि राहील. या निवडणुकांत कोकणासह रायगड, पालघर आणि इतर भागांत शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठे यश मिळवले असून, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा धनुष्यबाण घराघरात पोहोचला आहे. या निकालाने शिवसेनेची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला. हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. लोकसभा, विधानसभा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील स्ट्राइक रेट पाहता पुढील निवडणुकांतही महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 2:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagar Parishad Election: एकनाथ शिंदेंनी विजयाचं गणित मांडलं, फडणवीसांकडून १२ तासांत हिशेब चुकता









