Pregnancy Dental Checkup : प्रेग्नन्सी प्लॅन करण्याआधी दातांची तपासणी करा; दंततज्ज्ञांचा सल्ला, पण संबंध काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pre Pregnancy Test Dental Checkup : प्रेग्नन्सी आणि दातांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण प्रेग्नन्सीआधी दातांची तपासणी करणं खूप महत्त्वाचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
डॉ. भार्गवी म्हणाल्या, यामागील मुख्य कारण म्हणजे प्रेग्न्सीत दातांच्या समस्या आल्या तर बरीच बंधन येऊ शकतात. आधीच काही हिरड्यांच्या, दातांच्या समस्या आहेत, 20 ते 40 वयात प्रेग्न्सी प्लॅन करता तेव्हा या कालावधीत अक्कल दाढीची समस्या सामान्यपणे दिसून येते. हे जर काही प्रेग्नन्सीच्या आधीच तपासलं तर प्रेग्नंट झाल्यानंतर किंवा प्रेग्नन्सीच्या कालावधीत अशी समस्या उद्भवणार नाही ज्याच्यावरील उपचार आपल्यासाठी कठीण जातील.







