advertisement

Dementia : डिमेंशिया म्हणजे काय ? डिमेंशियाग्रस्त व्यक्तीमधे काय बदल जाणवतात ? घरच्या सदस्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ?

Last Updated:

कुटुंबातील एखादा सदस्य डिमेंशियासारख्या आजाराशी झुंजतो तेव्हा तो केवळ रुग्णासाठी आव्हानात्मक नसतो तर संपूर्ण कुटुंबासाठी भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारा अनुभव असतो. कुटुंबातील सदस्य काळजी घेतात पण काही काळानं ही जबाबदारी वाढत जाते. डिमेंशिया म्हणजे काय आणि याचा परिणाम कसा होत जातो समजून घेऊया. 

News18
News18
मुंबई : डिमेंशियासारखा आजार मुख्यत: स्मृती, विचार या सगळ्यावर परिणाम करतो. ज्या व्यक्तीला डिमेंशिया झालेला असतो त्या व्यक्तीला आणि घरातील इतर सदस्यांनाही याचे परिणाम जाणवतात.
कुटुंबातील एखादा सदस्य डिमेंशियासारख्या आजाराशी झुंजतो तेव्हा तो केवळ रुग्णासाठी आव्हानात्मक नसतो तर संपूर्ण कुटुंबासाठी भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारा अनुभव असतो. कुटुंबातील सदस्य काळजी घेतात पण काही काळानं ही जबाबदारी वाढत जाते. डिमेंशिया म्हणजे काय आणि याचा परिणाम कसा होत जातो समजून घेऊया.
डिमेंशिया हा एकच आजार नाही. हा आजार मेंदूतील मज्जातंतू पेशींना नुकसान पोहोचवणाऱ्या आजारांचा एक समूह आहे. याचा परिणाम स्मृती, विचार, संवाद आणि दैनंदिन कामं करण्याची क्षमता यावर होतो. हा आजार हळूहळू वाढतो आणि त्याचे वेगवेगळे टप्पे असतात, हे टप्पे कुटुंबांनी लवकर समजून घेतले आणि त्याची तयारी केली तर याचं व्यवस्थापन करणं शक्य होतं.
advertisement
डिमेंशियाचे टप्पे
सुरुवातीचा टप्पा - सुरुवातीला लक्षणं सौम्य असतात. रुग्ण अलीकडील घटना विसरू शकतात, गोष्टी चुकीच्या पद्धतीनं हाताळतात. या काळात त्यांना फारशी मदत किंवा आठवण करून देण्याची आवश्यकता नसते.
मध्यम टप्पा - रोग जसजसा वाढत जातो तसतशी स्मरणशक्ती कमी होते. रुग्णांना वेळ, दिवस किंवा ठिकाण याबद्दल गोंधळ होऊ शकतो, परिचितांना ओळखण्यात अडचण येऊ शकते आणि त्यांना दैनंदिन कामांमधे मदतीची आवश्यकता भासू शकते.
advertisement
अंतिम टप्पा - या टप्प्यात, रुग्णांची सतत काळजी घ्यावी लागते. त्यांना संवाद साधण्यात, मूलभूत कामं करण्यात किंवा कुटुंबातील सदस्यांना ओळखण्यात अडचण येऊ शकते.
डिमेंशिया असलेल्यांसाठी घरातील वातावरण खूप महत्वाचं आहे. लहान बदल त्यांना सुरक्षित आणि आरामदायी वाटू शकतात. उदाहरणार्थ, दिनचर्येत सातत्य असेल तर गोंधळ आणि चिंता कमी होऊ शकतात.
शांतपणे बोला, लहान वाक्ये वापरा आणि प्रतिसादांसाठी पुरेसा वेळ द्या.
advertisement
डिमेंशियाच्या रुग्णांना कधीकधी काही गोष्टी करणं शक्य नसतं. अशावेळी वाद घालण्याऐवजी लक्ष दुसरीकडे वळवा. कोणी प्रवास करण्याचा आग्रह धरत असेल तर थेट नाही म्हणण्याऐवजी त्यांना दुसऱ्या कामात गुंतवून पहा. रुग्णांशी वाद घालणं, ओरडणं किंवा तर्क करण्याचा प्रयत्न करणं यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
advertisement
डिमेंशिया असलेल्या पालकांची काळजी घेणं ही अनेकदा दीर्घ काळासाठाची जबाबदारी असते. कुटुंबांनी या प्रवासासाठी भावनिक आणि व्यावहारिकदृष्ट्या तयार असलं पाहिजे. यामधे आर्थिक तयारी, खर्चाची तयारी तसंच हा आजार कसा वाढतो हे समजून घेणं गरजेचं आहे.
घरात कशा पद्धतीनं मदत करणं शक्य आहे तसंच डेकेअर आणि मेमरी केअर सुविधांचा या सदस्याला कसा उपयोग होईल हे समजून घेणं आवश्यक आहे. प्रशिक्षित काळजीवाहकांची मदत घ्या आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यानंही डिमेंशियाग्रस्तांना मदत होऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dementia : डिमेंशिया म्हणजे काय ? डिमेंशियाग्रस्त व्यक्तीमधे काय बदल जाणवतात ? घरच्या सदस्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या ?
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement