Underarms : काखेतल्या काळेपणावर करा मात, या इलाजानं त्वचा होईल स्वच्छ, काळे डाग होतील कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
काखेतले काळे डाग कमी करण्यासाठी योग्य काळजी आणि योग्य उत्पादनं वापरली तर ही समस्या लक्षणीयरीत्या कमी करता येते. त्वचारोगतज्ज्ञ सुरभी बालाणी यांनी इंस्टाग्राम हँडलवर या विषयावर एक पोस्ट शेअर केली आहे. अंडरआर्म्सची त्वचा खूप संवेदनशील असते. वारंवार शेव्हिंग केल्यानं सूक्ष्म कट होतात, ज्यामुळे पिगमेंटेशन वाढू शकतं.
मुंबई : काही कारणांमुळे काखा काळ्या होतात. यामुळे खास करुन महिलांना स्लीवलेस कपडे घालता येत नाहीत. ही समस्या केवळ महिलांना नाही तर अंडरआर्म्सवरचे काळे डाग ही एक सामान्य समस्या आहे.
काखेतले काळे डाग कमी करण्यासाठी योग्य काळजी आणि योग्य उत्पादनं वापरली तर ही समस्या लक्षणीयरीत्या कमी करता येते. त्वचारोगतज्ज्ञ सुरभी बालाणी यांनी इंस्टाग्राम हँडलवर या विषयावर एक पोस्ट शेअर केली आहे. अंडरआर्म्सची त्वचा खूप संवेदनशील असते. वारंवार शेव्हिंग केल्यानं सूक्ष्म कट होतात, ज्यामुळे पिगमेंटेशन वाढू शकतं.
advertisement
याशिवाय, वॅक्सिंग, जास्त घाम येणं, घट्ट कपडे घालणं आणि डिओडोरंटचा जास्त वापर ही देखील काखा काळ्या होण्याची प्रमुख कारणं आहेत. या सर्व कारणांमुळे मृत त्वचा जमा होते आणि त्वचा हळूहळू काळी दिसू लागते.
यासाठी, त्वचेचे डॉक्टर ग्लायकोलिक अॅसिड वापरण्याची शिफारस करतात. ग्लायकोलिक अॅसिड हे एक प्रकारचे AHA (अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड) आहे. ते त्वचेच्या वरच्या थरातील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत करते.
advertisement
मृत त्वचा काढून टाकली की, काळे डाग हळूहळू हलके होतात. ग्लायकोलिक अॅसिड त्वचेचा पोत गुळगुळीत करते आणि अंडरआर्म्स अधिक स्वच्छ आणि उजळ दिसण्यास मदत करते.
ग्लायकोलिक अॅसिड टोनर स्वच्छ, कोरड्या अंडरआर्म्सवर लावा आणि ते तसंच राहू द्या. लावल्यानंतर त्वचा स्वच्छ धुण्याची गरज नाही. पहिल्यांदा वापरत असाल तर प्रथम पॅच टेस्ट करा. आठवड्यातून फक्त एक ते दोन वेळा वापरा. ग्लायकोलिक अॅसिड लावण्याच्या दिवशी शेव्हिंग किंवा वॅक्सिंग टाळा. लावल्यानंतर सौम्य, सुगंध नसलेलं मॉइश्चरायझर लावा. ते दररोज वापरू नका आणि खूप घट्ट कपडे घालू नका.
advertisement
नियमित आणि योग्य वापरानं, काखा उजळ होऊ लागतात आणि तीन-चार आठवड्यांत त्वचा नितळ दिसते. खूप काळे डाग येण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो असंही त्वचारोगतज्ज्ञांनी म्हटलंय.
योग्य उत्पादनं आणि योग्य पद्धत वापरल्यानं काखा स्वच्छ आणि गुळगुळीत राहण्यास मदत होऊ शकते. पण यामुळे सूज येणं, खाज सुटणं किंवा पुरळ येत असेल तर या पद्धती वापरणं ताबडतोब बंद करा आणि त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 12:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Underarms : काखेतल्या काळेपणावर करा मात, या इलाजानं त्वचा होईल स्वच्छ, काळे डाग होतील कमी