Central Railway: ‘डिसेंबर एंड’चा प्लॅन करताय? मुंबई ते हैदराबाद स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Central Railway: मुंबई ते हैदराबाद प्रवास करणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने खूशखबर दिली आहे. डिसेंबर अखेर विशेष रेल्वे धावणार आहे.
सोलापूर – डिसेंबर अखेर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सोलापूर, कलबुर्गी व वाडी स्थानकामार्गे मुंबई आणि हैदराबाद दरम्यान नवीन विशेष रेल्वे धावणार आहे. त्यामुळे आरामदायी आणि सुखकर प्रवास होणार आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागाने परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
मुंबई - हैदराबाद विशेष गाडी
मुंबई - हैदराबाददरम्यान विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक 07458 ही 28 डिसेंबर 2025 रोजी हैदराबाद येथून सायंकाळी 05 वाजून 30 मिनिटाला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 40 मिनिटाला एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) मुंबई येथे पोहोचेल.
advertisement
गाडी क्रमांक 07459 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - हैदराबाद नवीन वर्षाची विशेष गाडी 29 डिसेंबर 2025 सोमवार रोजी एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) मुंबई येथून दुपारी 03 वाजून 20 मिनिटाला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता हैदराबाद येथे पोहोचेल. तर या विशेष गाडीला बेगमपेट, लिंगमपल्ली, विकाराबाद, तांडूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण येथे थांबे मिळणार आहे.

डब्याची संरचना
1 फर्स्ट एसी कम एसी -II टायर, 2 एसी -II टायर, 5 एसी -III टायर, 10 स्लीपर क्लास, 2 सेकंड क्लास आणि 2 लगेज कम ब्रेक व्हॅन असे एकूण 22 डबे असणार आहेत. प्रवाशांनी गाड्यांचा तपशील पाहून वैध तिकिटासह प्रवास करून प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 27, 2025 12:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Central Railway: ‘डिसेंबर एंड’चा प्लॅन करताय? मुंबई ते हैदराबाद स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक