Winter Exercises : थंडीतही कायम ठेवा फिटनेस, गारठ्यातही शरीर राहिल तंदुरुस्त, या हेल्थ टिप्स जरुर वाचा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हिवाळ्यात जिममधे जाऊ शकत नसाल, तर घरी काही खास व्यायाम करून तंदुरुस्त राहणं शक्य आहे. थंडीच्या या दिवसात व्यायाम करण्याआधी वॉर्म अप करा.स्ट्रेचिंग आणि स्पॉट जॉगिंग, नंतर जंपिंग जॅक, स्क्वॉट्स, पुश-अप्स आणि लंजेस सारखे बॉडी वेट एक्सरसाइज करा. याव्यतिरिक्त, दिनचर्येत योगासनांचा समावेश करा. या सगळ्या सोप्या पण महत्त्वाच्या व्यायामांमुळे शरीर थंडीतही तंदुरुस्त राहिल.
मुंबई : थंडी वाढते तसं घरात उबदार वातावरणात राहावंसं वाटतं. याचा परिणाम म्हणजे हिवाळ्यात अनेकजण थंडी आणि दुसरं कारण म्हणजे आळसामुळे जिमला जाणं टाळतात.
हिवाळ्यात जिममधे जाऊ शकत नसाल, तर घरी काही खास व्यायाम करून तंदुरुस्त राहणं शक्य आहे. थंडीच्या या दिवसात व्यायाम करण्याआधी वॉर्म अप करा.
स्ट्रेचिंग आणि स्पॉट जॉगिंग, नंतर जंपिंग जॅक, स्क्वॉट्स, पुश-अप्स आणि लंजेस सारखे बॉडी वेट एक्सरसाइज करा. याव्यतिरिक्त, दिनचर्येत योगासनांचा समावेश करा. या सगळ्या सोप्या पण महत्त्वाच्या व्यायामांमुळे शरीर थंडीतही तंदुरुस्त राहिल.
advertisement
स्ट्रेचिंग - वॉर्म-अपनंतर स्नायू मोकळे करण्यासाठी थोडं स्ट्रेचिंग करा. नंतर, स्पॉट जॉगिंग करून पहा, शरीर उबदार करण्यासाठी आणि रक्ताभिसरण वाढवण्यासाठी जागीच हळू हळू जॉगिंग करा.
स्क्वॉट्स - स्क्वॉट्स या व्यायामामुळे पाय, कंबर आणि कोअर मसल्स बळकट होतात. यामुळे शरीराचं संतुलन सुधारतं. कॅलरीज बर्न करून वजन कमी करण्यास मदत होते आणि सांध्यांचं आरोग्य आणि हाडांची घनता सुधारून दुखापतींचा धोका कमी होतो, यामुळे दैनंदिन कामं सोपी होतात आणि शारीरिक ताकद आणि लवचिकता वाढते.
advertisement
पुश-अप्स - पुश-अप्स हा शरीरासाठी चांगला व्यायाम आहे. यामुळे छाती, खांदे, ट्रायसेप्स आणि कोर स्नायूंना बळकटी मिळते.
इथे सांगितलेल्या व्यायामांसाठी, कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नसते. योग्य तंत्र वापरलं तर या सगळ्या व्यायामांमुळे शरीर हिवाळ्यातही तंदुरुस्त राहतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 5:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Exercises : थंडीतही कायम ठेवा फिटनेस, गारठ्यातही शरीर राहिल तंदुरुस्त, या हेल्थ टिप्स जरुर वाचा











