पिंपरी-चिंचवडमध्ये मुस्लीम कार्ड, जर १५ हजार भाडं पाहिजे असेल तर... आंबेडकरांनी साद घातली

Last Updated:

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रकाश आंबेडकर यांची मुस्लिम समाजासोबत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. बैठकीत स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली असून राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद पणाला लावली आहे. पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच पिंपरीत मुस्लिम समाज आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्नांवर भाष्य केले आणि पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट केली. शहरातील झोपडपट्टीधारकांना जर 15 हजार मासिक भाडे अपेक्षित असेल, तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे, अशी साद आंबेडकर यांनी घातली.

मुस्लिम समाज व कार्यकर्त्यांशी संवाद

या दौऱ्यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शहरातील मुस्लिम समाजातील प्रमुख मौलवी, नेते, विचारवंत आणि कार्यकर्त्यांसोबत पत्रकार परिषद पार पडली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला भक्कम साथ देण्याचे आवाहन त्यांनी या बैठकीत केले. वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मुस्लिम समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
advertisement
पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांवरून सत्ताधारी आणि प्रशासनावर निशाणा साधला. शहराचा विकास करताना सामान्य नागरिक केंद्रस्थानी असायला हवा, असे मत त्यांनी मांडले. काही जिल्ह्यांमध्ये उमेदवारी जाहीर होण्यास सुरुवात झाली असल्याने, पिंपरी-चिंचवडमध्येही लवकरच पक्षाची अधिकृत भूमिका आणि उमेदवार स्पष्ट होतील, असे संकेत या दौऱ्यातून मिळाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्या पिंपरी चिंचवडसाठी पाच महत्त्वाच्या घोषणा

advertisement
१) SRA विरोधात नागरिकांच्या हक्काच्या घरांसाठी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला होता. SRA योजना राबवली जाते, मात्र नागरिकांना महिन्याचे भाडे दिले जात नाही. SRA अधिकाऱ्यांनी अद्याप भाड्याची रक्कम किती असावी हे निश्चित केलेले नाही.
२) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले, तर SRA संदर्भात ठराव करून SRA बिल्डिंगला परवानगी देण्याचा अधिकार महानगरपालिकेकडे ठेवण्यात येईल.
advertisement
३) महिन्याला 15 हजार रुपयांचा भाड्याचा करारनामा SRA बिल्डरांनी दिल्यानंतरच त्यांना परवानगी देण्याचा ठराव करण्यात येईल.
४) प्रस्थापित राजकीय पक्ष हे बिल्डरांचे पक्ष आहेत. त्यामुळे झोपडपट्टीधारकांना 15 हजार भाडे मिळावे, हा मुद्दा त्यांच्या जाहीरनाम्यात कुठेही दिसत नाही.
५) झोपडपट्टीधारकांना जर 15 हजार मासिक भाडे अपेक्षित असेल, तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे.
advertisement
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या विविध पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला साद घातल्याने शहरातील राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पिंपरी-चिंचवडमध्ये मुस्लीम कार्ड, जर १५ हजार भाडं पाहिजे असेल तर... आंबेडकरांनी साद घातली
Next Article
advertisement
BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement