Ikkis Starcast Fees: शेवटच्या चित्रपटासाठी धर्मेंद्र यांना मिळालं सर्वात कमी मानधन, अगस्त्य नंदाने घेतली तिप्पट फी

Last Updated:
Ikkis Starcast Fees: ज्यांनी आपल्या ६ दशकांच्या करिअरमध्ये सिनेसृष्टी गाजवली, त्या धर्मेंद्र यांना त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या चित्रपटासाठी अगस्त्यच्या तुलनेत निम्म्याहून कमी रक्कम मिळाली आहे.
1/8
मुंबई: येत्या १ जानेवारीला जेव्हा थिएटर्सचे पडदे उघडतील, तेव्हा अवघ्या देशाचे डोळे पाणावलेले असतील. निमित्त आहे, श्रीराम राघवन दिग्दर्शित 'इक्कीस' हा बहुप्रतीक्षित युद्धपट. हा चित्रपट केवळ एका शूरवीराची गाथा नाही, तर तो बॉलिवूडचे लाडके 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचा शेवटचा पडद्यावरचा वावर असणार आहे.

advertisement
2/8
२४ नोव्हेंबर २०२५ रोजी जगाचा निरोप घेतलेल्या धर्मेंद्र यांना शेवटचं पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेतच, पण सध्या चर्चा रंगली आहे ती या चित्रपटाच्या स्टारकास्टला मिळालेल्या मानधनाची. एका महानायकाच्या तुलनेत नवख्या कलाकाराला मिळालेली रक्कम पाहून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

3/8
एका खऱ्या आयुष्यातील हिरोची भूमिका साकारण्यासाठी अगस्त्यने जीवतोड मेहनत घेतली आहे. रिपोर्ट्सनुसार, या मुख्य भूमिकेसाठी अगस्त्यला ७० लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे. पदार्पणातच इतकी मोठी रक्कम मिळवणारा तो सध्याचा चर्चेतला स्टार किड ठरला आहे.

4/8
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्यांनी आपल्या ६ दशकांच्या करिअरमध्ये सिनेसृष्टी गाजवली, त्या धर्मेंद्र यांना त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या चित्रपटासाठी अगस्त्यच्या तुलनेत निम्म्याहून कमी रक्कम मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दिग्गज अभिनेत्याला केवळ २० लाख रुपये मिळाले आहेत.

5/8
एका लेजेंडरी अभिनेत्याला एका नवख्या पोरापेक्षा कमी मानधन मिळणं, हे अनेकांना रुचलेलं नाही. मात्र, जाणकारांच्या मते, धर्मेंद्र यांनी ही भूमिका पैशांसाठी नाही, तर श्रीराम राघवन यांच्यावरील प्रेमाखातर आणि भूमिकेच्या ओढीने स्वीकारली होती.

6/8
चित्रपटात इतरही काही महत्त्वाचे चेहरे आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'पाताल लोक' फेम जयदीप आजच्या घडीला एक हुकमी एक्का मानला जातो. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला ५० लाख रुपये देण्यात आले आहेत.

7/8
अक्षय कुमारची भाची सिमर हिचंही हे बॉलिवूड डेब्यु आहे. पण तिला मिळालेली रक्कम खूपच कमी आहे. तिला केवळ ५ लाख रुपये मानधन मिळाल्याचं समजतंय.

8/8
परमवीराची गाथा आणि अगस्त्यची एन्ट्री'इक्कीस' हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीरपुत्र सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलं आणि त्यांना 'परमवीर चक्र' प्रदान करण्यात आलं. या चित्रपटातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

BMC Election BJP : भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डाव
भाजपचा ‘३० मिनिट्स प्लॅन’! बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणी असा टाकणार मोठा डा
  • महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शेवटचे काही तास शिल्लक राहिल

  • भाजपने बंडखोरांना चितपट करण्यासाठी ३० मिनिट्स प्लॅन तयार केला

  • संभाव्य बंडखोरीला आळा घालण्यासाठी पक्षाने ही नवी रणनिती आखल्याचे समोर आले आहे

View All
advertisement