बीड : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत उशिरा झोपणे ही अनेकांची सवय बनली आहे. मोबाईल, सोशल मीडिया, टीव्ही, ऑनलाइन काम किंवा मानसिक ताणतणाव यामुळे झोपेची नैसर्गिक वेळ मागे पडत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, उशिरा झोपण्याचे दुष्परिणाम केवळ थकव्यापुरते मर्यादित नसून त्याचा थेट परिणाम शरीराच्या एकूण आरोग्यावर होत आहे. वेळेवर आणि पुरेशी झोप न घेतल्यास शरीरातील जैविक घड्याळ बिघडते आणि विविध आजारांची शक्यता वाढते, असे बीड येथील आरोग्य तज्ज्ञ राहुल वेताळ सांगतात.
Last Updated: Dec 29, 2025, 17:45 IST


