थर्टीफर्स्टला एकादशी! मग करा झणझणीत वांगे अन् गावरान बट्टीचा बेत, स्पेशल रेसिपी VIDEO
- Reported by:Kale Narayan
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
३१ डिसेंबर रोजी एकादशी असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. जर तुम्ही सुद्धा ३१ डिसेंबरच्या दिवशी नॉनव्हेज खाणार नसाल किंवा शाकाहरी असाल, तर तुम्ही ३१ डिसेंबरच्या दिवशी भाजलेल्या बट्ट्यांचा बेत आखू शकता.
नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाला आहे. अनेकजण सध्या ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी विशेष नियोजन करताना दिसत आहेत. नॉनव्हेज प्रेमींसाठी या दिवशी तर एक विशेष पर्वणीच असते. मात्र ३१ डिसेंबर रोजी एकादशी असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. जर तुम्ही सुद्धा ३१ डिसेंबरच्या दिवशी नॉनव्हेज खाणार नसाल किंवा शाकाहरी असाल, तर तुम्ही ३१ डिसेंबरच्या दिवशी भाजलेल्या बट्ट्यांचा बेत आखू शकता.
भाजलेल्या बट्ट्यांना विदर्भात रोडगे म्हणतात. मराठवाड्यात देखील हा खास पदार्थ अत्यंत लोकप्रिय झाला आहे. दोन किलो जाडसर गव्हाचे पीठ, गरजेनुसार किंवा आवडीनुसार मका, रवा, दोन चमचे ओवा, तेल, रोडगे भाजण्यासाठी गोवऱ्या ईत्यादी अशा साहित्यांची आवश्यकता आहे.
कृती: सर्वप्रथम रोडगे भाजण्यासाठी चार ते पाच किलो गोवऱ्यांची भट्टी पेटवायची आहे. यासाठी तुम्ही जमिनीत छोटा खड्डा खोदू शकता. इकडे गव्हाचे, मकाचे पीठ आणि रवा एकत्र करून त्यात ओवा घालून घट्ट अशी कणीक मळून घ्यायची आहे. नरम पणा येण्यासाठी कणीक मळताना तेल वापरू शकता किंवा काहीजण दही वापरतात.
advertisement
कणेकेचे गोल गोल गोळे तयार करा. इकडे पेटवलेल्या गोवऱ्याचा मस्तपैकी विस्तव तोपर्यत तयार होईल. हे गोल गोळे या आहारावर व्यवस्थित भाजून घ्या . सर्व बाजून नीट भाजल्यानंतर रोडगे काढून घ्या. विस्तवात खोल जागा करून हे गोळे पुन्हा त्यात टाका आणि त्यावरून टोपले किवा पातेले झाकून ठेवा. किमान १० ते १५ मिनिटे असेच ठेवा.
advertisement
यानंतर हे गोळे बाहेर काढून कपड्याने किंवा गोणपाटाने स्वच्छ करा. रेगुलर आपण करतो त्याप्रमाणे वरणाला आपल्या आवडीनुसार फोडणी द्या. रोडगे अनेकजण तुपात मॅरेनेट करून देखील वरणासोबत ताव मारतात. लिंबू कांदा झणझणीत तर्रीदार वरणासोबत या रोडग्यावर आपण ताव मारू शकता.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
Dec 29, 2025 8:48 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
थर्टीफर्स्टला एकादशी! मग करा झणझणीत वांगे अन् गावरान बट्टीचा बेत, स्पेशल रेसिपी VIDEO










