युद्ध सुरु होण्याआधीच शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हा मोठा धक्का शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला मानावा लागणार आहे. "त्या पक्षात असताना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही,अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला" असं त्यांनी पक्ष सोडण्याचं कारण सांगितलं
Last Updated: Dec 29, 2025, 21:17 IST


