नैसर्गिक आपत्ती: भूकंप आणि पुराचा धोका
कुंभ ही वायू तत्त्वाची रास आहे आणि धनिष्ठा नक्षत्र हे मंगळाचे नक्षत्र आहे. सूर्य आणि राहूच्या युतीमुळे पृथ्वीच्या भूगर्भीय हालचालींमध्ये मोठी वाढ होऊ शकते. यामुळे जगभरातील काही संवेदनशील पट्ट्यांमध्ये भीषण भूकंप होण्याची शक्यता आहे. तसेच, ऋतूचक्रात अचानक बदल होऊन काही भागांत अवेळी अतिवृष्टी आणि महापुराचे संकट ओढवू शकते.
advertisement
विमान आणि रेल्वे दुर्घटनांचे संकेत
ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि राहूचा संबंध अपघातांशी जोडला जातो. कुंभ राशीतील हे ग्रहण हवाई वाहतुकीसाठी अशुभ मानले जात आहे. ग्रहणाच्या प्रभावामुळे तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकीमुळे मोठ्या विमान दुर्घटना किंवा रेल्वे अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रवाशांनी या काळात विशेषतः प्रवासाचे नियम पाळणे गरजेचे आहे.
जागतिक राजकीय उथल-पुथल
सूर्य हा सत्तेचा आणि राजाचा कारक आहे. सूर्याला राहूने ग्रासल्यामुळे अनेक देशांच्या सत्ताधाऱ्यांसमोर मोठी आव्हाने उभी राहतील. काही देशांमध्ये अंतर्गत बंडाळी, सत्तांतर किंवा मोठ्या राजकीय नेत्याचा अपघाती मृत्यू होण्याची भीती आहे. दोन मोठ्या राष्ट्रांमधील तणाव वाढून युद्धसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
आर्थिक मंदी आणि बाजारातील अस्थिरता
पंचग्रही युतीमुळे जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी वाढ किंवा घट होऊन गुंतवणूकदारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्र आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये घोटाळे उघडकीस येऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होईल.
नवीन आजार आणि सार्वजनिक आरोग्य
राहू आणि सूर्याची युती विषाणूजन्य आजारांना निमंत्रण देते. ग्रहणाच्या प्रभावामुळे एखादा नवीन संसर्गजन्य आजार पसरण्याची किंवा जुन्याच आजाराचे स्वरूप बदलून ते अधिक घातक होण्याची शक्यता आहे. विशेषतः श्वसनाचे विकार आणि मानसिक तणावाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते.
आग आणि स्फोटांच्या घटना
मंगळाच्या नक्षत्रात हे ग्रहण होत असल्याने अग्नीभय वाढणार आहे. मोठ्या कारखान्यांमध्ये आग लागणे, गॅस गळती किंवा सीमावर्ती भागात स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. जनसामान्यांमध्ये संताप आणि हिंसक प्रवृत्ती वाढण्याची शक्यता असल्याने सामाजिक शांतता धोक्यात येऊ शकते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
