TRENDING:

चंद्र-सूर्याचा भयंकर योग! होळी संपताच ३ राशींवर येणार मोठी संकट, एका पाठोपाठ होणार प्रचंड नुकसान

Last Updated:

Astrology News : होळीचा सण आला की वातावरणात आपोआपच उत्साह संचारतो. मतभेद विसरून एकमेकांना रंग लावण्याचा, प्रेम आणि आपुलकी जपण्याचा हा उत्सव हिंदू संस्कृतीत विशेष मानाचा आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : होळीचा सण आला की वातावरणात आपोआपच उत्साह संचारतो. मतभेद विसरून एकमेकांना रंग लावण्याचा, प्रेम आणि आपुलकी जपण्याचा हा उत्सव हिंदू संस्कृतीत विशेष मानाचा आहे. प्रत्येकालाच हा सण आनंद, समाधान आणि भरभराट घेऊन यावा, अशी अपेक्षा असते. मात्र ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर सण-उत्सवांच्या काळातही ग्रहांच्या हालचाली मानवी जीवनावर परिणाम करत असतात. होळीनंतर लगेचच असा एक ग्रहयोग निर्माण होत असून, त्याचा प्रभाव काही राशींवर नकारात्मक ठरू शकतो, असा इशारा ज्योतिषांकडून दिला जात आहे.
Astrology News
Astrology News
advertisement

ज्योतिषशास्त्रात “व्यतिपात योग” हा अत्यंत संवेदनशील आणि प्रभावी मानला जातो. सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या समोरासमोर, म्हणजेच १८० अंशांच्या अंतरावर येतात, तेव्हा हा योग तयार होतो. या काळात ग्रहांची ऊर्जा तीव्र स्वरूपात कार्य करते. पंचांगानुसार, शनिवारी दुपारी ३.०५ वाजल्यापासून हा योग प्रभावी होणार आहे. या कालावधीत विचार न करता घेतलेले निर्णय, भावनांवर नियंत्रण नसणे किंवा जोखीम पत्करणे अडचणीचे ठरू शकते. विशेषतः तीन राशींनी या काळात अधिक सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.

advertisement

सिंह राशी

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ तणाव वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या अचानक वाढू शकतात, ज्यामुळे मानसिक दडपण जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता असून, लहानशी चूकही मोठ्या अडचणीचे कारण बनू शकते. आर्थिक व्यवहारांमध्ये जोखीम टाळावी. नवीन गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय काही काळ पुढे ढकललेले बरे. कौटुंबिक पातळीवर अहंकारामुळे वाद निर्माण होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी, थकवा किंवा डोळ्यांशी संबंधित त्रास जाणवू शकतो. वाहन चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

advertisement

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा योग भावनिक अस्थिरता घेऊन येऊ शकतो. चिडचिड वाढणे, जवळच्या व्यक्तींशी गैरसमज होणे किंवा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लपलेले विरोधक सक्रिय होऊ शकतात, त्यामुळे आपल्या योजना अडचणीत येऊ शकतात. आर्थिक नुकसान किंवा अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होण्याची चिन्हे आहेत. आरोग्याच्या बाबतीत पोटाचे विकार किंवा रक्तदाबाशी संबंधित तक्रारी वाढू शकतात. प्रवास करताना आणि महत्त्वाचे निर्णय घेताना संयम बाळगणे हिताचे ठरेल.

advertisement

कुंभ राशी

कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात मानसिक ताण आणि अस्वस्थता जाणवू शकते. कामात एकाग्रता कमी होईल, त्यामुळे निर्णय घेताना गोंधळ उडू शकतो. मित्र किंवा सहकाऱ्यांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. अचानक खर्च वाढल्याने आर्थिक नियोजन बिघडू शकते. पैसे उधार देणे किंवा घेणे टाळावे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यामुळे चिंता वाटू शकते. झोपेची कमतरता आणि सततची चिंता यामुळे थकवा जाणवेल. वाहन किंवा यंत्रसामग्री हाताळताना अधिक दक्षता आवश्यक आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
चंद्र-सूर्याचा भयंकर योग! होळी संपताच ३ राशींवर येणार मोठी संकट, एका पाठोपाठ होणार प्रचंड नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल