जकात म्हणजे संपत्तीचे शुद्धीकरण आणि वाढ. यात मुस्लिम व्यक्तीला बचत किंवा वार्षिक संपत्तीमधील 2.5 टक्के हिस्सा गरजू, गरीब, अपंग, विधवा किंवा इतर पात्र व्यक्तींना दान करावा लागतो. सोने, चांदी, रोख, शेती उत्पादन अशा संपत्तीवरून मूल्य काढून चाळीसावा हिस्सा जकात म्हणून दिला जातो. संपत्ती असलेल्या प्रत्येक मुस्लिमवर जकात फर्ज आहे, पण सोने-चांदी, रोख किंवा व्यवसाय नसलेल्यांना ती बंधनकारक नाही.
advertisement
जकात रमजानपुरती मर्यादित नसून वर्षभरात कोणत्याही वेळी दिली जाऊ शकते. मात्र, रमजानमध्ये नेकीचे पुण्य 70 गुणा वाढते म्हणून इस्लामी विद्वान रमजानमध्ये जकात देण्याची शिफारस करतात. यामुळे संपत्ती शुद्ध होते तसेच गरीबांना ईद साजरी करता येते. दाता आणि लाभार्थी दोघांनाही मोठे पुण्य मिळते.
काझी अब्दूर राफे म्हणाले, जकात ही इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक असून सामाजिक समानतेसाठी महत्त्वाची आहे. या महिन्यात मुस्लिम बांधवांनी जकात फर्ज पार पाडावा, असे आवाहन त्यांनी केले.





