TRENDING:

आज संकष्टी चतुर्थीचा दिवस! ७ राशींसाठी ठरणार भाग्यशाली, संकट दूर होणार, जीवनात आनंदी आनंद येणार

Last Updated:

Today Horoscope : वैदिक पंचांगानुसार आज, ५ एप्रिल २०२६, रविवार असून आजचा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वैदिक पंचांगानुसार आज, ५ एप्रिल २०२६, रविवार असून आजचा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज संकष्ट चतुर्थीचा शुभ योग जुळून आला आहे. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा केली जाते. आज ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे एक दुर्मिळ योग तयार होत असून त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसून येण्याची शक्यता आहे. सूर्यदेव आणि गणपतीच्या कृपेने अनेक राशींसाठी आजचा दिवस लाभदायक आणि सकारात्मक ठरणार आहे. जाणून घेऊया आजचे राशीभविष्य.
Today Horoscope
Today Horoscope
advertisement

मेष 

आजचा दिवस आनंददायी ठरणार असला तरी मन काहीसे अस्थिर राहू शकते. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना इतरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

वृषभ 

भागीदारीचे नवे प्रस्ताव समोर येऊ शकतात. मात्र कोणताही निर्णय घेताना सर्व बाजूंचा नीट विचार करा. महिलांना त्यांच्या कौशल्याला वाव देणाऱ्या संधी मिळतील.

मिथुन 

आज आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. फुफ्फुसांशी संबंधित त्रास किंवा पाठदुखी जाणवू शकते, त्यामुळे काळजी घ्या.

advertisement

कर्क 

इतरांचे ऐका पण निर्णय स्वतःच्या मनाने घ्या. अर्धवट कामे सोडून नवीन गोष्टींच्या मागे लागल्यास नुकसान होऊ शकते.

सिंह 

कुटुंबासोबत प्रवासाचे योग आहेत. तसेच वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांमध्ये सुधारणा करण्याची गरज भासू शकते.

कन्या 

घरातील मतभेद उफाळून येऊ शकतात. अशावेळी शांततेने आणि सामंजस्याने परिस्थिती हाताळणे अधिक योग्य ठरेल.

advertisement

तूळ 

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळेल अशा शाखेची निवड करणे गरजेचे ठरेल.

वृश्चिक 

अति भावनिक होणे टाळा. मान-अपमानाच्या भावना तीव्र होऊ शकतात, त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे.

धनु 

सरकारी कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. मात्र काही अपेक्षा अपूर्ण राहिल्यामुळे निराशा जाणवू शकते.

advertisement

मकर 

अवास्तव कल्पनांमध्ये रमल्यामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. कोणत्याही गोष्टीवर आंधळा विश्वास ठेवू नका.

कुंभ 

जलद श्रीमंत होण्याच्या मोहापासून दूर राहा. मेहनतीशिवाय यश मिळत नाही, हे लक्षात ठेवा.

मीन 

भावनिक पाठबळ मिळेल, पण त्याचवेळी इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा ताण येऊ शकतो. महिलांमध्ये विसरभोळेपणा वाढण्याची शक्यता आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

(सदर बातमी फक्त महितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस! ७ राशींसाठी ठरणार भाग्यशाली, संकट दूर होणार, जीवनात आनंदी आनंद येणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल