TRENDING:

एप्रिलमधील 'तो' सर्वात भाग्यशाली दिवस जवळ आला! या ३ राशींच्या लोकांनी फक्त नोटा मोजायच्या, राजासारखं आयुष्य जगणार

Last Updated:

Today Horoscope : हनुमान जयंतीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते अक्षय्य तृतीया या शुभ सणाकडे. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हनुमान जयंतीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते अक्षय्य तृतीया या शुभ सणाकडे. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 'अक्षय्य' म्हणजे कधीही न संपणारे पुण्य, संपत्ती आणि समृद्धी सतत वाढत राहते, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी खरेदी, गुंतवणूक आणि नवीन कामांची सुरुवात शुभ मानली जाते.
Astrology News
Astrology News
advertisement

यंदाची अक्षय्य तृतीया खास का?

वैदिक पंचांगानुसार, यंदा अक्षय्य तृतीया १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी केली जाणार आहे. यावर्षी या दिवशी चंद्र आणि गुरू यांच्या विशेष संयोगामुळे गजकेसरी योग निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग अत्यंत शुभ मानला जातो.

गजकेसरी योगामुळे काही राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि जीवनात सकारात्मक बदल अनुभवायला मिळू शकतात. विशेषतः तीन राशींना या योगाचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

advertisement

मेष

करिअर आणि आर्थिक स्थितीत भरभराट होईल.मेष राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीया अत्यंत लाभदायक ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची मोठी संधी मिळेल.आर्थिक स्थिती मजबूत होईल. नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे.दीर्घकालीन आजारातून आराम मिळू शकतो.परदेशात काम करण्याचे स्वप्न पूर्ण होण्याची संधी मिळेल. एकूणच,मेष राशीच्या व्यक्तींना या काळात यशाची नवी दारे उघडताना दिसतील.

advertisement

तूळ

तूळ राशीच्या लोकांवर या काळात देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहील. उत्पन्नात वाढ आणि आर्थिक स्थैर्य वाढेल.व्यवसायात चांगला नफा मिळेल. मालमत्ता खरेदीसाठी अनुकूल वेळ असेल. नवीन संधींमुळे भरघोस कमाईची होईल, अक्षय्य तृतीयेपासून तुमचे नशीब उजळण्याचे संकेत आहेत.

धनु

धनु राशीच्या लोकांसाठीही हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळेल.परदेश प्रवास घडेल. घर किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या राशीच्या व्यक्तींना प्रगतीच्या अनेक संधी मिळण्याची शक्यता आहे.

advertisement

एकूणच, यंदा गजकेसरी योगामुळे मेष, तूळ आणि धनु राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक काळ ठरणार आहे. योग्य निर्णय आणि प्रयत्न केल्यास या संधींचा पुरेपूर फायदा घेता येऊ शकतो.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
एप्रिलमधील 'तो' सर्वात भाग्यशाली दिवस जवळ आला! या ३ राशींच्या लोकांनी फक्त नोटा मोजायच्या, राजासारखं आयुष्य जगणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल