31 डिसेंबरला भागवत एकादशीचा दुर्मिळ योग
यंदा 31 डिसेंबरला 'पुत्रदा एकादशी' आहे. एकादशी हा विष्णू भक्तीचा सर्वोच्च दिवस मानला जातो. या दिवशी जगभरातील विष्णू भक्त उपवास करतात. रात्री 1:48 पर्यंत एकादशीची तिथी असल्याने, नवीन वर्षाचे स्वागत मद्यपानाने करणे हे आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत अशुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही मांसाहार किंवा मद्यपान करण्याचा विचार करत असाल तर आधीच सावधगिरी बाळगा.
advertisement
मांसाहार आणि मद्यपानाचे नुकसान
शास्त्रांनुसार, एकादशीच्या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान केल्याने व्यक्तीच्या शरीरात तामसिक ऊर्जेचा संचार होतो. या दिवशी अन्नात 'पाप' वास करते असे मानले जाते. थर्टी फर्स्टच्या रात्री केलेली एक चूक तुमच्या वर्षभराच्या संचित पुण्याचा नाश करू शकते.
1 जानेवारीला गुरुवार - 'गुरू' बळाचा दिवस
2026 वर्षाची सुरुवात गुरुवारी होत आहे. गुरुवार हा देवगुरू बृहस्पती आणि विष्णूंचा वार आहे. गुरु हा समृद्धी आणि ज्ञानाचा कारक आहे. एकादशीच्या उपवासानंतर वर्षाचा पहिला दिवस गुरुवारी येणे हे शुभ आहे, मात्र आदल्या रात्री पापात गुंतल्यास गुरु ग्रहाची कृपादृष्टी फिरू शकते.
उपवास चुकवल्यास होणारे नुकसान
एकादशीचा उपवास केवळ अन्नाचा त्याग नसून तो मनाचा संयम आहे. पुराणांनुसार, जो व्यक्ती जाणूनबुजून एकादशीला अभक्ष्य भक्षण करतो, त्याला शारीरिक व्याधी, आर्थिक नुकसान आणि मानसिक अशांतीला सामोरे जावे लागते. यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग खुंटू शकतो.
2019 नंतरचा दुर्मिळ संयोग
अशा प्रकारे 31 डिसेंबरला एकादशी येण्याचा योग तब्बल 6 वर्षांनंतर आला आहे. या काळात निसर्गातील ऊर्जा बदललेली असते. या शुभ दिवशी संयम पाळल्यास तुमचे पूर्ण वर्ष सकारात्मक जाईल, मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास दुर्दैव पाठ सोडू शकत नाही.
नवीन वर्षाची आध्यात्मिक सुरुवात कशी करावी?
पार्ट्यांमध्ये पैसे आणि आरोग्य घालवण्याऐवजी, 31 डिसेंबरला विष्णू नामस्मरण करावे. 1 जानेवारीला सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करून वर्षाची सुरुवात करावी. यामुळे 364 दिवस तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. 31 डिसेंबरची रात्र ही केवळ तारखेचा बदल नसून यंदा तो आध्यात्मिक जागृतीचा क्षण आहे. क्षणिक आनंदासाठी आपल्या भाग्याचे गणित बिघडवू नका. सात्विकतेने नवीन वर्षाचे स्वागत करा.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
