शास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मग्रंथांमध्ये किंवा पुराणांमध्ये गर्भवती महिलांना शिवपूजेपासून रोखणारा कोणताही स्पष्ट निषेध नाही. भगवान शिव हे 'आशुतोष' आणि 'भक्तवत्सल' आहेत. स्कंद पुराणानुसार, संतान सुख आणि गर्भधारणेतील कष्टांपासून मुक्ती मिळवण्यासाठी महादेवाची आराधना करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
शिवलिंग पूजेचे गर्भवती महिलांसाठी फायदे
मानसिक शांती: गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांना तणाव आणि 'मूड स्विंग्स'चा सामना करावा लागतो. शिवपूजेमुळे मन शांत राहते.
advertisement
नकारात्मक ऊर्जेपासून रक्षण: महादेवाची भक्ती आई आणि बाळ दोघांभोवती एक सुरक्षा कवच निर्माण करते, ज्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही.
बाळावर सुसंस्कार: आईने केलेली भक्ती आणि मंत्रोच्चाराचा सकारात्मक परिणाम गर्भातील बाळाच्या बुद्धीवर आणि स्वभावावर होतो.
काय घ्यावी काळजी?
बसून पूजा करावी: गर्भवती महिलांनी मंदिरात जास्त वेळ उभे राहून पूजा करू नये. शारीरिक थकवा टाळण्यासाठी आरामात बसूनच जलार्पण किंवा अभिषेक करावा.
शिवलिंगाला स्पर्श: काही मान्यतेनुसार, गर्भधारणेच्या सातव्या महिन्यानंतर शिवलिंगाला थेट स्पर्श करणे टाळावे, असे सुचवले जाते. त्याऐवजी दुरूनच दर्शन घेणे किंवा घरातील छोट्या शिवलिंगाची पूजा करणे अधिक योग्य मानले जाते.
कठीण उपवास टाळावा: शिवपूजेमध्ये उपवासाचे महत्त्व असले तरी, गर्भवती महिलांनी 'निर्जला' किंवा कठीण उपवास करू नयेत. केवळ फलाहार करून किंवा सात्विक भोजन घेऊन भक्ती करावी.
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे: मोठ्या शिवमंदिरांमध्ये खूप गर्दी आणि धक्काबुक्की असू शकते. संसर्ग टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी गर्दीच्या वेळी मंदिरात जाणे टाळावे.
हवन आणि धूर: जर मंदिरात होम-हवन सुरू असेल, तर त्याच्या धुराचा त्रास गर्भवती महिलेला होऊ शकतो. अशा वेळी हवनापासून सुरक्षित अंतर ठेवावे.
मंत्र जप: शिवलिंगावर जलाभिषेक करताना 'ॐ नमः शिवाय' या मंत्राचा जप करणे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम मानले जाते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
