मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी 25 फेब्रुवारीपासून सुरू होणारे गोचर प्रगतीची दारे उघडणारे ठरेल. गेल्या अनेक महिन्यांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळतील. गुंतवणुकीसाठी हा काळ उत्तम असून शेअर बाजार किंवा मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. घरात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील.
advertisement
कन्या
कन्या राशीच्या जातकांसाठी हे गोचर मानसिक शांतता आणि आत्मविश्वात वाढ करणारे असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. नवीन कौशल्य शिकण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. व्यापाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल. नवीन करार पूर्ण होतील आणि व्यवसायाचा विस्तार होईल. प्रदीर्घ आजारातून सुटका होईल. तुमची कार्यक्षमता वाढल्यामुळे तुम्ही कठीण कामेही सहज पूर्ण कराल.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी गुरू-चंद्राची ही स्थिती भाग्योदय करणारी ठरेल. घरात नवीन वस्तू किंवा वाहनाची खरेदी होऊ शकते. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्त्रोत निर्माण झाल्यामुळे तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुमच्या सल्ल्याला लोक महत्त्व देतील. राजकारण किंवा सामाजिक कार्यात असलेल्या लोकांसाठी मोठे पद मिळण्याचे योग आहेत. तीर्थयात्रा किंवा परदेश प्रवासाचे बेत आखले जातील, जे भविष्यात फायदेशीर ठरतील.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
