सोन्याचा प्रभाव आणि ज्योतिषीय कारण
सोने हा उष्ण प्रकृतीचा धातू आहे. तो शरीरातील उष्णता वाढवण्याचे काम करतो. गुरु हा ग्रह ज्ञान आणि संपत्तीचा कारक आहे, तर सूर्य हा सत्तेचा. ज्या राशींचा स्वामी मंगळ, सूर्य किंवा गुरु आहे, त्यांच्यासाठी सोने शुभ असते. मात्र, ज्या राशींचे स्वामी शनि, शुक्र किंवा बुध आहेत, त्यांच्यासाठी सोन्याचा उष्ण प्रभाव त्यांच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध जातो. यामुळे अशा व्यक्तींच्या जीवनात तणाव वाढतो आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
advertisement
'या' 3 राशींच्या लोकांनी सोने घालताना सावध राहावे
वृषभ
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि गुरु यांच्यात शत्रुत्वाचा भाव आहे. सोने हे गुरुचे प्रतीक असल्याने वृषभ राशीच्या व्यक्तींनी सोने घातल्यास त्यांच्या आयुष्यात आर्थिक चढ-उतार येऊ शकतात. विशेषतः सोन्याच्या अंगठ्या किंवा चेन घातल्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात विनाकारण कुरबुरी सुरू होण्याची शक्यता असते.
मिथुन
मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध आणि गुरु यांच्यातील संबंध समतोल नाहीत. मिथुन राशीच्या व्यक्तींनी खूप जास्त सोने परिधान केल्यास त्यांची निर्णयक्षमता बाधित होऊ शकते. या व्यक्तींच्या प्रगतीत अडथळे येतात आणि त्यांना अनेकदा मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. जर सोने घालायचेच असेल, तर त्यांनी आधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कुंभ
कुंभ राशीचा स्वामी शनि देव आहे. शनी आणि गुरु यांच्यात समभाव असला तरी, कुंभ ही वायू तत्त्वाची रास आहे. सोन्याचा अतिवापर या राशीच्या लोकांसाठी भाग्यात अडथळे निर्माण करू शकतो. सोने परिधान केल्याने कुंभ राशीच्या व्यक्तींचा खर्च वाढतो आणि त्यांच्या कष्टाचे पूर्ण फळ त्यांना मिळत नाही, असे मानले जाते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
