TRENDING:

Mahashivratri 2026 : आर्थिक स्थैर्य मिळणार, व्यवसायात नवीन संधी, महाशिवरात्रीला या 4 राशींवर महादेवाची विशेष कृपादृष्टी, Video

Last Updated:

रुद्राभिषेक, मंत्रजप आणि उपवास करून शिवभक्त महादेवाची आराधना करत आहेत. यंदाची महाशिवरात्री काही राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: आज देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. रुद्राभिषेक, मंत्रजप आणि उपवास करून शिवभक्त महादेवाची आराधना करत आहेत. यंदाची महाशिवरात्री काही राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. त्या राशी कोणत्या आहेत यासंदर्भात माहिती गुरुजी अशोक पाटील यांनी दिली.
advertisement

गुरुजी अशोक पाटील यांनी सांगितले की, यंदाची महाशिवरात्री काही राशींसाठी मोठा सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. वृषभ, कर्क, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींवर महादेवाची विशेष कृपादृष्टी राहणार आहे. या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्याचे संकेत आहेत. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात.

advertisement

Weather Alert: महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, आता येतंय नवं संकट, हवामान खात्याचा अलर्ट

वृषभ राशी :

यंदाची महाशिवरात्री वृषभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळू शकते. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कामाचा ताण कमी होईल आणि मन शांत राहील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील.

कर्क रास :

advertisement

कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव मानला जातो. त्यामुळे यंदाची महाशिवरात्री कर्क राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकते. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक घडामोडी होण्याची शक्यता आहे.

मकर राशी :

मकर राशीवर शनिग्रहाचा प्रभाव असतो आणि शनी हे भगवान शिवांचे भक्त मानले जातात. त्यामुळे यंदाची महाशिवरात्री मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुभ संकेत देणारी ठरू शकते. आर्थिक बाबतीत काही चांगल्या संधी मिळू शकतात. उत्पन्न वाढण्याची किंवा थांबलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

advertisement

कुंभ राशी :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
3201 शिवलिंगांचे शिवमंदिर, गुप्त 12 ज्योतिर्लिंगांचीही दर्शन,कुठे आहे हे ठिकाण?
सर्व पहा

कुंभ राशीवर शनिग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे यंदाची महाशिवरात्री कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. आधी तोटा होत असलेल्या कामांमध्येही सुधारणा दिसू शकते. काहींना अचानक फायदा होण्याचे संकेत आहेत.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Mahashivratri 2026 : आर्थिक स्थैर्य मिळणार, व्यवसायात नवीन संधी, महाशिवरात्रीला या 4 राशींवर महादेवाची विशेष कृपादृष्टी, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल