'या' 3 राशींसाठी धोक्याची घंटा
कन्या
कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्र सहाव्या भावात प्रवेश करणार आहे. या काळात गुप्त शत्रू सक्रिय होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्याविरुद्ध कटकारस्थान होण्याची शक्यता आहे. जुन्या कर्जप्रकरणांमुळे तणाव वाढू शकतो. विलासी वस्तूंवर अवाजवी खर्च करणे टाळा, अन्यथा आर्थिक बजेट कोलमडू शकते. पोटाचे विकार किंवा मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
advertisement
धनु
धनु राशीच्या जातकांसाठी शुक्र तिसऱ्या भावात गोचर करणार आहे. नवीन व्यवसाय किंवा कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ फारसा अनुकूल नाही. कामात वारंवार अडथळे येऊ शकतात. भावंडांशी किंवा जवळच्या मित्रांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. विनाकारण होणारे प्रवास थकवणारे आणि खर्चिक ठरू शकतात.
मीन
मीन राशीच्या जातकांसाठी शुक्र बाराव्या भावात जाणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान असेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाल्याने मानसिक अस्वस्थता जाणवेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर घाई करू नका. कामाच्या ठिकाणी दबावामुळे तुमची कार्यक्षमता कमी होऊ शकते. कोर्ट-कचेरीच्या कामात अडकण्याची भीती आहे, त्यामुळे कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करू नका.
बचावासाठी 3 प्रभावी उपाय
1. शुक्र मंत्र: दररोज 'ॐ शुं शुक्राय नमः' या मंत्राचा जप करा. यामुळे शुक्राचे नकारात्मक प्रभाव कमी होतात.
2. दान: शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे लाभदायक ठरेल.
3. स्वच्छता: स्वतःची आणि घराची स्वच्छता राखा. सुगंधी अत्तर किंवा परफ्यूमचा वापर करणे देखील शुभ मानले जाते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
