चांदी धारण करण्याचे ज्योतिषीय महत्त्व
चांदी हा जल तत्वाचा धातू मानला जातो. ज्या व्यक्तींना खूप राग येतो किंवा ज्यांचे मन चंचल असते, त्यांना चांदीची अंगठी किंवा कडा घालण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहते आणि मानसिक एकाग्रता वाढते. तथापि, अग्नी तत्वाच्या राशींसाठी चांदीचा थंड प्रभाव कधीकधी प्रतिकूल ठरू शकतो, ज्यामुळे प्रगतीत अडथळे येतात.
advertisement
चांदी कोणासाठी 'लकी' आणि कोणासाठी 'अनलकी'
'या' 3 राशींसाठी चांदी ठरते वरदान
कर्क, वृश्चिक आणि मीन या जल तत्वाच्या राशींसाठी चांदी अत्यंत शुभ मानली जाते. कर्क राशीचा स्वामी स्वतः चंद्र आहे, त्यामुळे चांदी घातल्याने या व्यक्तींची निर्णयक्षमता सुधारते. वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांना आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांतीसाठी चांदीचे दागिने अतिशय लाभदायी ठरतात. या राशीच्या लोकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन चांदीमध्ये इन्व्हेस्ट करणं या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकत.
'या' राशींनी चांदी घालणे टाळावे
मेष, सिंह आणि धनु या अग्नी तत्वाच्या राशींसाठी चांदी सामान्यतः अशुभ मानली जाते. या राशींचा स्वामी मंगळ, सूर्य आणि गुरू आहेत. अग्नी आणि जल हे एकमेकांचे विरोधी तत्व असल्याने, या राशींच्या लोकांनी चांदी धारण केल्यास त्यांना कामात अपयश, पैसा विनाकारण खर्च होणे किंवा स्वभाव चिडचिडा होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
कोणासाठी आहे घातक?
ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्र आधीच खूप बलवान आहे किंवा जे स्वभावाने आधीच खूप शांत आणि हळवे आहेत, त्यांनी चांदीचा अतिवापर करू नये. यामुळे त्यांच्यात आळस वाढू शकतो किंवा ते अतिभावनिक होऊन चुकीचे निर्णय घेऊ शकतात. चांदी केवळ सौंदर्य वाढवण्यासाठी नाही, तर ग्रहांच्या शांतीसाठीही वापरली जाते. जर तुम्ही मेष, सिंह किंवा धनु राशीचे असाल, तर चांदी घालण्यापूर्वी तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला नक्की घ्यावा.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
