'या' 3 राशींनी राहावे अत्यंत सावध
मेष - आर्थिक फटका आणि आरोग्याची चिंता
मेष राशीच्या जातकांसाठी हे ग्रहण अकराव्या भावात होत असले तरी, राहू-सूर्याची युती तुमच्यासाठी काही बाबतीत नकारात्मक ठरू शकते. मित्रपरिवाराशी असलेले संबंध बिघडू शकतात. तसेच, अचानक उद्भवणाऱ्या खर्चामुळे तुमचे आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. डोळ्यांच्या किंवा डोकेदुखीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.
advertisement
कन्या - गुप्त शत्रू आणि मानसिक तणाव
कन्या राशीसाठी हे ग्रहण सहाव्या भावात होत आहे. हे स्थान रोग आणि शत्रूंचे मानले जाते. कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करू शकतात. विनाकारण भीती आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. जुन्या आजारांनी पुन्हा डोके वर काढल्यामुळे हॉस्पिटलचा फेरा होऊ शकतो. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि वादाच्या प्रसंगातून स्वतःला लांब ठेवा.
कुंभ - स्वतःच्या राशीत ग्रहण, निर्णयांची भीती
सर्वात जास्त परिणाम कुंभ राशीवर होणार आहे, कारण सूर्य आणि राहूची युती तुमच्याच राशीत होत आहे. तुमच्या आत्मविश्वासाला तडा जाऊ शकतो. चुकीच्या निर्णयामुळे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती आहे. जोडीदारासोबत ताणतणाव निर्माण होऊन घरातील शांतता भंग पावेल. रागावर नियंत्रण ठेवा आणि महत्त्वाचे कायदेशीर कागदपत्रे घाईघाईत स्वाक्षरी करू नका.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
