TRENDING:

पुढचे 5 वर्ष सुखाचे! युरेनसमुळे नशिबाचे चक्र फिरणार, 2031 पर्यंत 'या' राशींचा गोल्डन टाइम; होणार मालामाल

Last Updated:

ज्योतिषशास्त्रामध्ये युरेनस ग्रह हा अत्यंत मंद गतीने चालणारा ग्रह मानला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे 7 ते 8 वर्षांचा काळ लागतो. सध्या युरेनस ग्रह आपल्या नीच राशीत म्हणजे वृषभ राशीत विराजमान आहे आणि तो 6 जुलै 2031 पर्यंत याच राशीत राहणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Uranus Gochar : ज्योतिषशास्त्रामध्ये युरेनस ग्रह हा अत्यंत मंद गतीने चालणारा ग्रह मानला जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला सुमारे 7 ते 8 वर्षांचा काळ लागतो. सध्या युरेनस ग्रह आपल्या नीच राशीत म्हणजे वृषभ राशीत विराजमान आहे आणि तो 6 जुलै 2031 पर्यंत याच राशीत राहणार आहे. युरेनस हा 'अचानक' बदल घडवून आणणारा ग्रह मानला जातो. जेव्हा तो नीच राशीत असतो, तेव्हा त्याचे परिणाम अनपेक्षित पण मोठे असतात. ज्योतिषीय गणनेनुसार, 2026 ते 2031 या कालावधीत मेष, वृषभ आणि सिंह या तीन राशींच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
News18
News18
advertisement

या 3 राशींसाठी धनलाभाचे संकेत

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी युरेनस ग्रहाचे हे संक्रमण अत्यंत लाभदायक ठरेल. युरेनस ग्रह अचानक प्रगती देणारा मानला जातो, त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये 'सडन ग्रोथ' पाहायला मिळेल. नोकरी करणाऱ्यांना अनपेक्षित पदोन्नती किंवा पगारात मोठी वाढ मिळू शकते. व्यापाऱ्यांना एखादा असा मोठा करार मिळू शकतो, जो त्यांच्या व्यवसायाचे स्वरूप बदलून टाकेल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक चांगला परतावा मिळेल आणि तुमची आर्थिक बाजू भक्कम होईल.

advertisement

वृषभ रास

युरेनस ग्रह सध्या तुमच्याच राशीत आहे. जरी ही त्याची नीच रास असली, तरी तुमच्यासाठी ती प्रलंबित कामे पूर्ण करणारी ठरेल. अनेक वर्षांपासून अडकलेले किंवा बुडालेले पैसे या काळात अचानक परत मिळू शकतात. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग खुले होतील. तुम्ही ज्या कामात हात घालताल, तिथे सुरुवातीला संघर्ष झाला तरी अंतिम यश तुमचेच असेल. सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल.

advertisement

सिंह रास

सिंह राशीच्या जातकांसाठी युरेनस ग्रहाचा हा काळ सुवर्णकाळापेक्षा कमी नसेल. तुमच्या राशीसाठी हा काळ आर्थिक सुबत्ता घेऊन येणार आहे. अनपेक्षित स्त्रोतातून धनलाभ होण्याचे योग आहेत. कामानिमित्त केलेले परदेश प्रवास किंवा लांबचे प्रवास प्रचंड आर्थिक फायदा करून देतील. जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसाय बदलायचा असेल, तर 2026-2031 दरम्यान घेतलेला निर्णय तुम्हाला करोडपती बनवू शकतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
पुढचे 5 वर्ष सुखाचे! युरेनसमुळे नशिबाचे चक्र फिरणार, 2031 पर्यंत 'या' राशींचा गोल्डन टाइम; होणार मालामाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल