TRENDING:

जमीन खरेदीची संधी, पण गुंतवणूक करताना.., पाहा कन्या राशीचे फेब्रुवारीतील मासिक भविष्य, Video

Last Updated:

करिअर, प्रेम आणि शिक्षण याबाबत कन्या राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा असेल? जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : कन्या राशी ही राशी चक्रातील सहावी राशी असून तिचा स्वामी बुध आहे. आता जानेवारी महिना संपून फेब्रुवारी सुरू होत आहे. त्यामुळे अनेकजण मासिक राशीभविष्य पाहात असतात. कन्या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना कसा जाणार आहे? याबाबत पुणे येथील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिलीय.

कसे असतात कन्या राशीचे लोक?

advertisement

कन्या राशीचे लोक स्वभावाने विनम्र आणि मृदुभाषी असतात. हे लोक खरे मित्र असल्याचे सिद्ध करतात आणि त्यांची मैत्री टिकवून ठेवण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. त्यांच्याकडे अप्रतिम व्यवस्थापन क्षमता असते. तसेच ते त्यांचे विश्लेषण कौशल्य, तर्कशास्त्र आणि बुद्धिमत्तेमध्ये चांगले असतात. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यावर हे लोक आधी घाबरतात पण नंतर स्वतःवर नियंत्रण ठेवतात आणि परिस्थितीवर ताबा मिळवतात. अनेक वेळा लोक त्यांची नम्रता ही कमजोरी मानतात. प्रत्येक मुद्दा समजून घेण्याची क्षमता त्यांच्यात असते.

advertisement

प्रेमींसाठी अनुकूल काळ, करिअरमध्ये..., मीन राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video

अनुकूल परिणाम देणारा काळ

कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना बऱ्याच प्रमाणात अनुकूल परिणाम देणारा सिद्ध होऊ शकतो. त्यासाठी व्यवहारात बदल आणावा लागेल. एकाकी राहणे किंवा वेगळे राहण्याची भावना जन्म घेऊ शकते. जी तुमच्यासाठी उत्तम नसेल. यामुळे तुमचे लोकच तुमच्यापासून दूर होऊ शकतात. स्वतःला लोकांसमोर प्रकट करा, यामुळे तुमचे नाते प्रबळ होईल.

advertisement

जमीन खरेदीची संधी

जमीन खरेदीची स्थिती बनू शकते. गाडी ही खरेदी करू शकतात. या महिन्यात शारीरिक दृष्ट्या थोडी काळजी घ्यावी लागेल. कारण, स्वास्थ्य संबंधित समस्या तुम्हाला चिंतीत करू शकतात. विदेश जाण्याचे स्वप्नही या महिन्यात पूर्ण होऊ शकते. करिअरच्या दृष्टीकोनाने हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. महिन्याची सुरवात विद्यार्थ्यांसाठी खूप अनुकूल राहणारी आहे. सूर्य आणि बुध एक सोबत पंचम भावात स्थित होऊन बुधादित्य योग बनवेल, असे ज्योतिषी सांगतात.

advertisement

आर्थिक लाभाची शक्यता, काळ्या कुत्र्याला द्या भाकरी; कर्क राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी?

प्रेमसंबंधांसाठी अनुकूल महिना

जर तुम्ही प्रेम संबंधात असाल तर, महिन्याची सुरुवात खूप अनुकूल राहील. सूर्य आणि बुध पंचम भावात राहून तुमच्या प्रियकराला खूप चांगल्या बुद्धीचा आणि शुभ विचारांनी युक्त बनवेल. धन गुंतवणूक करण्यासाठी वेळ अधिक अनुकूल सांगितली जात नाही. त्यामुळे सावधान राहा. हा महिना स्वास्थ्य दृष्टिकोनाने मध्यम राहण्याची शक्यता आहे. शनी महाराज सहाव्या भावात राहून जुन्या आजारांना आराम देईल आणि तुम्हाला तुमच्या आजारांचा सामना करण्याचे साहस प्रदान करेल, असे ज्योतिषी जोशी सांगतात.

उपाय

शुक्ल पक्षाच्या मंगळवारी कुठल्याही मंदिरात लाल रंगाचा त्रिकोणी झेंडा लावा, असं ज्योतिषी सांगतात.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
जमीन खरेदीची संधी, पण गुंतवणूक करताना.., पाहा कन्या राशीचे फेब्रुवारीतील मासिक भविष्य, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल