किंमतीच्या बाबतीत Honda Shine 100 थोडी जास्त परवडणारी आहे. याची एक्स-शोरुम किंमत जवळपास 65,557 रुपये आहे. तर Bajaj Platina 100 ची किंमत 65,897 रुपयांपासून सुरु होते. तुम्हाला या दोन्हीमधून एक निवडायची असेल आणि तुम्ही कंफ्यूज असाल तर ही माहिती तुम्हाला खुप फायदेशीर ठरु शकते. चला या दोन्ही बाईक्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
टाटा पंचपासून मारुती फ्रोंक्सपर्यंत, 'या' आहेत देशातील 5 सर्वात स्वस्त SUVs
डिझाइनमध्ये कोणते चांगले आहे?
Honda Shine 100 ची डिझाइन आधुनिक आणि स्टायलिश आहे. त्यात स्लिम फ्युएल टँक, ग्राफिक्ससह बॉडी पॅनेल आणि क्रोम अॅक्सेंट आहेत. ते पाच कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे: लाल, निळा आणि काळा, ज्यामुळे ते तरुण रायडर्ससाठी आकर्षक बनते. त्याचे वजन 99 किलो आहे, ज्यामुळे ते हलके आणि सहज हाताळता येते.
तसंच Bajaj Platina 100 ची डिझाइन क्लासिक आहे. यामध्ये लांब सीट, गोल्डन सस्पेंशन आणि LED DRLs चा समावेश आहे. ही 4 कलर ऑप्शन्समध्ये येते. याचं वजन 117 KG आहे जे थोडं जड आहे. दोन्हीमध्ये अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स आहेत.
फीचर्समध्ये कोण भारी?
फीचर्सच्या हिशोबाने Bajaj Platina 100 सर्वात पुढे आहे. यामध्ये अडव्हान्सड कॉम्फोर्टेक टेक्नॉलॉजी, लांब आणि सॉफ्ट सीट, इलेक्ट्रिक-स्टार्ट (बटणाने स्टार्ट) LED DRL,नवीन रियर-व्ह्यू मिरर्स आणि वाइडर रबर फुटपॅड्स आहेत. Honda Shine 100 मध्ये बेसिक फीचर्स जसं की, कॉम्बी ब्रेक सिस्टम (CBS),सायलेंट स्टार्ट आणि सिंपल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आहेत. दोन्हीमध्ये ड्रम ब्रेक्स आहेत. मात्र Bajaj मध्ये लाँग सस्पेशन चांगलं कम्फर्ट देते.
मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री मारणार ही Hybrid SUV! मिळेल 35km मायलेजसह ADAS, किंमत फक्त...
इंजिन आणि मायलेज
Honda Shine 100 मध्ये 98.98 cc चं 4-स्ट्रोक SI इंजन आहे. जे 7.28 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क देते. हे एयर-कूल्ड आहे आणि फ्यूल इंजेक्शन सिस्टमसह येते. जे चांगला परफॉर्मेंस आणि कमी एमीशन करते. Bajaj Platina 100 मध्ये 102 cc चा DTS-i (डिजिटल ट्विन स्पार्क इग्निशन) इंजिन आहे. जे 7.79 bhp पॉवर आणि 8.34 Nm टॉर्क देते. प्लॅटीना 100 चा क्लेम्ड मायलेज 70 KMPL च्या जवळपास आहे. तसंच शाइन 100 ला एक लिटर पेट्रोलमध्ये 65 KM पर्यंत चालवलं जाऊ शकतं.
