Level-2 ADAS
आजचा काळ हा मॉडर्न आहे. ज्यामुळे कारही मॉर्डन झाल्या आहेत. आता कारमध्ये Level-2 ADAS फीचर आहे. यात ऑटोमॅटिक इमर्जेंसी ब्रेकिंग, लेन-कीप असिस्ट आणि अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोलसारख्या सिस्टमचा समावेश असतो. ही टेक्नॉलॉजी रस्त्यावरील धोका आधीच ओळखते. यासोबतच गरज पडल्यावर स्वतःच ब्रेक लावू शकते. हायवेवर पुढे चालत असलेल्या गाडीपासून दूर राहते आणइ कार आफल्या लेनमध्येच ठेवते. पहिले हे फीचर फक्त महागड्या गाड्यांमध्येच मिळायचे. पण आता फॅमिली सेफ्टीसाठी अवश्य ठरते.
advertisement
'या' आहेत देशातील सर्वात स्वस्त डिझेल ऑटोमॅटिक SUV! 24KMचं जबरदस्त मायलेज, किंमत फक्त...
360-डिग्री कॅमेरा
भारतासारख्या गर्दीच्या शहरांमध्ये पार्किंग करणं सोपं नाही. ज्यामुळे 360-डिग्री कॅमेरा ही समस्या सहज सोडवू शकते. हे फीचर कारचा वरुन पूर्ण व्ह्यू दाखवते. ज्यामुले तुम्ही प्रत्येक दिशेला कोणता अडथळा आहे हे सहज पाहू शकता. ज्यामुळे तुम्हाला गर्दीत गाडी पार्क करणं सोपं होतं. रिव्हर्स करताना व्हिजिबिलिटी मिळते. स्क्रॅच आणि टक्कर होण्यापासून बचाव होतो.
टचस्क्रीन आणि वायरलेस कनेक्टिव्हिटी
2026 मध्ये मोठी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आता आवश्यक फीचर बनलीये 10-इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या स्क्रीनसह वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto मिळणं सामान्य झालंय. म्हणजेच आता केबल लावण्याची गरज नाही. तुमचा फोन लगेच कनेक्ट होतो. नेव्हिगेशन, कॉल आणि म्यूझिकचा सोपा अॅक्सेस मिळतो. ड्राइव्ह करताना कमी डिस्ट्रॅक्शन होतं. कार आणि स्मार्टफोनचं भारी कनेक्शन यामुळे साधता येतं.भारतातील उष्णता पाहता व्हेंटिलेटेड सीट्स आता लग्जरी नाही. तर गरज बनले आहेत. हे सीट्स हवा सर्कुलेट करते, ज्यामुळे लांबच्या प्रवास किंवा ट्रॅफिकमध्येही कूल आणि कंफर्टेबल वाटतं. एकदा याचा वापर केल्यास सामान्य सीटवर जाणं कठीण वाटू लागतं.
24 किमी मायलेज, सेफ्टीमध्ये टँकसारख्या दणकट; फॅमिलीसाठी बेस्ट अशा भारतातील टॉप 3 डिझेल SUV
सेफ्टी फीचर्स
आता कार खरेदी करताना सेफ्टी फीचर्सकडे लक्ष देणं गरजेचं असतं. याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. 2026 च्या कारमध्ये बेसिक फीचर्स अवश्य असायला हवेत. यामध्ये किमान 6 एयरबॅग्स, ABS (एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम), ESC म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल. हे सर्व फीचर्स मिळून अपघाताच्या वेळी तुमची सुरक्षा वाढवतात. यासोबतच कार कंट्रोलमध्ये ठेवण्यात मदत करतात.
हे फीचर्सही वेगाने गरजेचे ठरताय
या 5 मोठ्या फीचर्स व्यतिरिक्त आणखी काही टेक्नॉलॉजीही वेगाने स्टँडर्ड बनतेय. जी तुमच्या कारला आणखी जास्त अडव्हान्स बनवते. यात एक आहे वायरलेस चार्जिंग पॅड, बिल्ट-इन डॅशकॅम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल. OTA अपडेट्स, ज्यामुळे कार वेळेबरोबर आणखी चांगली होत राहते.
