उत्तर प्रदेशमधील फरुखाबाद इथं ही घटना घडली आहे. २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. मृत महिला ही थार चालकाची आजी होती. नातू रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्याा थार कारमध्ये घरी पोहोचला. थार घरात पार्क करण्यासाठी भरपूर जागा होती.
advertisement
नातावाची गाडी आली म्हणून आजीने गेट उघडला, त्यानंतर नाताने आपली थार गाडी आरामात घरात आणून उभी केली. त्यानंतर आजी ही गेटवरच उभी होती. तोपर्यंत नातवाने थार उभी केली आणि बाहेर आला. पण, अचानक उतार असल्यामुळे थार थेट मागे आली. गेटवर उभी असलेली आजी ही थारच्या मागे सापडली.
नेमकं काय घडलं?
महिंद्रा थार थेट मागे येत गेली आणि त्यासोबत आजीही मागे फरफटत आली आणि थेट भिंतीला आदळली. थारला मागे असलेलं भलमोठं स्टेपनी चाकामागे आजी दबली गेली. Thar चा वेग कमी होता पण धडक बसल्यामुळे आजीचा जागेवरच मृत्यू झाला.
Thar जेव्हा मागे येत होती तेव्हा नातवाने धाव घेतली, एवढंच नाहीतर थारने जेव्हा आजीला चिरडलं तेव्हा तो स्वत: गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यात त्यालाही इजा झाली, हे सगळं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. त्याने गाडीची चावी शोधण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. आजीचा डोळ्यादेखत मृत्यू झाला.
घटनास्थळी लोकांनी गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तसंच सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. प्रथमदर्शी ही दुर्घटना वाटत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पण, एका छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली.
