TRENDING:

आधी ओव्हरटेक नंतर समोर जाऊन ब्रेक लावला, ट्रक थेट बोलेरोवर उलटला, मन विचलित करणारा VIDEO

Last Updated:

चौकात आल्यानंतर बोलेरोनं ट्रकला ओव्हरटेक करून चौकातून वळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठीमागून हा ट्रक आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतात सध्या अपघातातून कसं वाचता येईल, यासाठी सेफ वाहनं खरेदीकडे कल वाढला आहे. टाटा आणि महिंद्रा या भारतीय कंपन्या आघाडीवर आहे. टाटा आणि महिंद्राच्या कार आणि एसयूव्ही या सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंगसह मार्केटमध्ये दबदबा निर्माण करून आहे. पण, बऱ्याच वेळा कार कितीही सेफ असली तर अपघाताच्या वेळी नेमकं काय घडेल हे सांगू शकत नाही. असाच एका महिंद्राच्या लिजेंड बोलेरोचा अपघात झाला आहे. भरधाव ट्रक बोलेरोवर उलटला आणि या अपघातात बोलेरोचा चक्काचूर झाला. या अपघातात ड्रायव्हरचा जागेवरच मृत्यू झाला.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील रामपूर भागातील नैनीताल महामार्गावर ही घटना घडली. या अपघातात ४० वर्षीय ड्रायव्हरचा जागेवरच मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास नैनीताल महामार्गावरून बोलेरो आणि लाकडाचा भुस्सा भरलेला ट्रक जात होता. चौकात आल्यानंतर बोलेरोनं ट्रकला ओव्हरटेक करून चौकातून वळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठीमागून हा ट्रक आला. अचानक समोर बोलेरो आल्यामुळे ट्रकचालकाने डिव्हायडरवर ट्रक चढवला. पण,  डिव्हायडरला धडकल्यानंतर ट्रक हा थेट बोलेरोवर उलटला.

advertisement

ट्रक जसा उलटला त्या खाली बोलेरो सापडली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा भुस्सा होता. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक उलटल्यामुळे बोलेरोचा चक्काचूर झाला. बोलेरोचा फक्त सपाट सांगाडा उरला होता. बोलेरोमध्ये फक्त चालक होता. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. घटनास्थळी लोकांनी धाव घेऊन भुस्सा बाजूला केला. पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बोलेरो चालकाचा मृतदेह अक्षरश: पत्रा कापून काढण्यात आला होता. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

advertisement

घटनास्थळी पोलीस पोहोचले पण त्याआधीच ट्रकचालक पसार झाला होता. अपघातग्रस्त बोलेरो ही विज विभागाची होती. कंत्राटी पद्धतीने खोड पॉवर सबस्टेशनवर सेवेत होती.  पोलिसांनी सांगितलं की, शासकीय वाहन असलेली बोलेरोनं काही अंतरावर आधी ट्रकला ओव्हरटेक केला होता. त्यानंतर चौकातून ही यु-टर्न घेणार होती. पण बोलेरो चालकाने यु-टर्न घेताना प्रयत्न करत होता, त्यावेळी ट्रक हा सरळ पुढे आला. समोर बोलेरो पाहून ट्रक ड्रायव्हर धडक होण्यापासून वाचण्यासाठी ट्रक विरूद्ध बाजूला वळवला. त्यावेळी डिव्हायडरला धडकला आणि बोलेरोवर उलटला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं ठिकाण, 40 दिवस चालते यात्रा, हंडी मटण खाण्यासाठी असते गर्दी
सर्व पहा

अचानक झालेल्या या घटनेमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्यावर ट्रकमधला भुस्सा सर्वत्र पसरला होता. घटनास्थळावर १२ पेक्षा जास्त रुग्णावाहिका दाखल झाल्या होत्या. अखेरीस क्रेनच्या मदतीने ट्रक बाजूला करण्यात आला आणि भुस्सा हा गोळा करण्यात आला. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भुस्सा भरण्यात आला होता. ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस या ट्रकचालकाचा शोध घेत आहे.

advertisement

मराठी बातम्या/ऑटो/
आधी ओव्हरटेक नंतर समोर जाऊन ब्रेक लावला, ट्रक थेट बोलेरोवर उलटला, मन विचलित करणारा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल