रायबरेली : सतत लोकं म्हणतात की, एका यशस्वी पुरुषामागे एका महिलेचा हात असतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका व्यक्तीबाबत सांगणार आहोत, ज्यांनी या म्हणीच्या अगदी विरुद्ध केले आहे. म्हणजे एका महिलेच्या यशामागे एका पुरुषाने महत्त्वाची भूमिका निभावली. यामुळे एक महिला डेप्युटी जेलर झाली आहे. नेमकी त्यांनी हे यश कसे मिळवले, हे जाणून घेऊयात.
advertisement
निमिषा भारद्वाज असे या महिलेचे नाव आहे. त्या रायबरेली जिल्ह्यातील परशदेपुर नगर पंचायतीमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्या मूळ बस्ती जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्यांचे इंटरमिजिएटचे शिक्षण गोरखपूर शहरातील कार्मेल गर्ल्स स्कूलमधून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी गोरखपूरच्या आयटीएम गीडा येथून बीटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चंदीगड येथील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयातून एमटेक केले. त्यांनी अभियंता व्हावे, असे त्यांच्या कुटुंबाचे स्वप्न होते.
मात्र, काही काळानंतर त्यांचे लग्न आशुतोष पांडे यांच्याशी झाले. आशुतोष पांडे हे एनटीपीस फरक्का, पश्चिम बंगाल येथे वरिष्ठ व्यवस्थापक पदावर आहेत. लग्नानंतर निमिषा भारद्वाज यांच्या आयुष्यात बदल झाला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पतीची इच्छा होती की, त्यांनी यूपी पीएससी परिक्षेची तयारी करुन अधिकारी व्हावे. पतीने मला नेहमी प्रेरित केले. याचा परिणाम असा झाला की, मी 2019 मध्ये उत्तर प्रदेश निम्न अधीनस्थ सेवा निवड आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली आणि माझी कार्यकारी अधिकारी पदासाठी निवड झाली.
याठिकाणी आहे ही शाही इमारत, स्वर्गापेक्षा कमी नाही, पाहा सुंदर photos
यशाचे श्रेय कुणाला दिले -
यानंतर, माझ्या पदाचा कार्यभार निभावत असताना, मी अभ्यास सुरू ठेवला आणि नंतर माझी यूपीपीएससी 2023 च्या परीक्षेत डेप्युटी जेलर पदासाठी निवड झाली. त्यांनी सांगितले की, माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय हे माझे पती आशुतोष पांडेय यांना तसेच माझे आईवडील आणि सासू सासरे यांना जाते. माझी एक 5 वर्षांची मुलगीही आहे. मी ऑफिसला आल्यानंतर तसेच माझ्या अभ्यास करण्याच्या वेळेदरम्यान, आई मुलीची काळजी घेत होती आणि मला नेहमी अभ्यासासाठी प्रेरित करत होती. याचा परिणाम म्हणून माझी आज या पदासाठी निवड झाली असे त्यांनी सांगितले.