राज्यातील बाजारात आज कांद्याची तब्बल 3 लाख 77 हजार क्विंटल आवक झाली. तर कांद्याला सरासरी 1125 रुपये दर मिळाला. राज्यात सर्वाधिक 67 हजार क्विंटल कांद्याची आवक पुणे मोशी बाजारात झाली. तर कांद्याला सर्वात जास्त 2570
रुपये दर कामठी बाजारात मिळाला.
डाळिंबाच्या दरात उलथापालथ, हळदीच्या भावात मोठी उसळी, आल्याची काय स्थिती?
advertisement
राज्यात सर्वाधिक 5560 क्विंटल कापसाची आवक राळेगाव बाजारात झाली. तर कापसाला सर्वाधिक 8038 रुपयांचा भाव अकोला बोरगाव मंजू या बाजार समितीत मिळाला. कापसाचे भाव आजही दबावात असल्याचे पहायला मिळत आहेत.
राज्यात सर्वाधिक 4535 क्विंटल तुरीची आवक मलकापूर बाजारात झाली. तर जालना बाजार समितीत तुरीला सर्वाधिक 8650 रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. तुरीचे दर देखील शुक्रवारी काहीसे दबावात असल्याचे दिसून आले.
कारंजा बाजार समितीत सर्वाधिक 7000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सर्वात जास्त दर वाशिम बाजार समितीत 6500 रुपये एवढा मिळाला. सोयाबीनला राज्यात आज सरासरी 5500 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.





