advertisement

Soybean Rate : सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video

Last Updated:

कापूस आणि कांद्याचे दर दबावात असले तरी तूर आणि सोयाबीनच्या दरात तेजी आहे.

+
News18

News18

जालना : राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दर दबावात आहेत. तर तूर, सोयाबीन आणि कापसाची देखील मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. कापूस आणि कांद्याचे दर दबावात असले तरी तूर आणि सोयाबीनच्या दरात तेजी आहे. पाहुयात राज्यातील बाजार समित्यात 6 फेब्रुवारीला आवक आणि बाजारभावाची स्थिती कशी राहिली.
राज्यातील बाजारात आज कांद्याची तब्बल 3 लाख 77 हजार क्विंटल आवक झाली. तर कांद्याला सरासरी 1125 रुपये दर मिळाला. राज्यात सर्वाधिक 67 हजार क्विंटल कांद्याची आवक पुणे मोशी बाजारात झाली. तर कांद्याला सर्वात जास्त 2570
रुपये दर कामठी बाजारात मिळाला.
advertisement
राज्यात सर्वाधिक 5560 क्विंटल कापसाची आवक राळेगाव बाजारात झाली. तर कापसाला सर्वाधिक 8038 रुपयांचा भाव अकोला बोरगाव मंजू या बाजार समितीत मिळाला. कापसाचे भाव आजही दबावात असल्याचे पहायला मिळत आहेत.
राज्यात सर्वाधिक 4535 क्विंटल तुरीची आवक मलकापूर बाजारात झाली. तर जालना बाजार समितीत तुरीला सर्वाधिक 8650 रुपये  प्रती क्विंटल असा दर मिळाला. तुरीचे दर देखील शुक्रवारी काहीसे दबावात असल्याचे दिसून आले.
advertisement
कारंजा बाजार समितीत सर्वाधिक 7000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. तर सर्वात जास्त दर वाशिम बाजार समितीत 6500 रुपये एवढा मिळाला. सोयाबीनला राज्यात आज सरासरी 5500 रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Soybean Rate : सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement