जेवणाच्या ताटावर झाला बाप-लेकाचा वाद
पोलिसांच्या माहितीनुसार रामराव तेल्हारककर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे, तर शिवाजी तेल्हारकर आणि त्याचा मुलगा कृष्णा तेल्हारकर अशी आरोपींची नावं आहेत. 13 ऑगस्ट रोजी वडील रामराव यांनी मुलगा शिवाजी याला टोचून बोलले की, "तू काम करत नाही. घराकडे लक्ष देत नाहीस." त्याचवेळी ताटात उष्टं अन्न ठेवल्यामुळे दोघा बापलेकांच्यात वाद झाला. संतापलेल्या मुलाने अर्थात शिवाजीने कुऱ्हाडीने वडिलांच्या गळ्यावर आणि शरीरावर वार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 19 ऑगस्ट रोजी ही घटना उघडकीस आली.
advertisement
बायकोने उघड केला नवऱ्याचा कांड
त्यानंतर मुख्य आरोपी शिवाजी आणि त्यांचा मुलगा (मृत व्यक्तीचा नातू) कृष्णा या दोघांनी मिळून मृतदेह प्लॅस्टिकच्या पोत्यात भरला. ते घेऊन दुचाकीवरून खिरोडा पुलावर गेले आणि पूर्णा नदीत मृतदेह फेकून दिला. ही घटना दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र मृत व्यक्तीची सून योगिता शिवाजी तेल्हारकर हिने पोलिसांत जाऊन फिर्याद दिली. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : जांभळावरून वाद, चुलत भावाची हत्या, पुरावे हाती लागताच आरोपीची आत्महत्या, पण हत्येमागे होतं 'हे' खरं कारण
हे ही वाचा : भीषण! गुराख्यावर वाघाचा हल्ला, 2 पाय अन् 1 हात पूर्णपणे खाल्ला, 'या' गावात पसरलीय वाघाची दहशत