जांभळावरून वाद, चुलत भावाची हत्या, पुरावे हाती लागताच आरोपीची आत्महत्या, पण हत्येमागे होतं 'हे' खरं कारण
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
दोन चुलत भावांमध्ये जांभळावरून किरकोळ भांडण झालं. एकाने दुसऱ्या भावाला संपवलं. खून केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. 'आता आपल्याला...'
गंगापूर : दोन चुलत भावांमध्ये जांभळावरून किरकोळ भांडण झालं. एकाने दुसऱ्या भावाला संपवलं. खून केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. 'आता आपल्याला पोलीस पकडणार', या भीतीतून आरोपीनेही आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना गंगापूर तालुक्यातील मुद्देश वडगाव येथे घडली.
बिस्किट आणायला गेला आणि...
पोलिसांच्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी बिस्किट आणण्यासाठी गावात जाणाऱ्या सिद्धार्थ विजय चव्हाण (वय-12) या शाळकरी मुलाचा मुद्देश वडगाव शिवारात खून झाल्याचे घटना घडली होती. या घटनेनंतर 3 दिवसांत सिद्धार्थचा चुलत भाऊ स्वप्नील संजय चव्हाण (वय-22) याचा मृतदेह शिवारातील एका विहिरीत सापडला. या प्रकरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलेलं आहे.
advertisement
घटनेमागे होता भावकीचा वाद
सिद्धार्थ आणि स्वप्नीलच्या वडिलांमध्ये भावकीतील वाद होता. तो वाद पोलिसांच्या मदतीने मिटवण्यात आला होता. पण या वादाचा परिणाम या दोन भावांवर झालेला होता. त्यामुळे दोघांच्यात सारखे खटके उडत होते. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि स्वप्नील यांच्यात जांभळावरून किरकोळ वाद झालेला होता. त्याचा राग स्वप्नीलच्या मनात होता. त्यामुळे बिस्किट आणायला गेलेल्या सिद्धार्थची स्वप्नीलने हत्या केली.
advertisement
पकडले जाणार, या भीतीने केली आरोपीची आत्महत्या
सिद्धार्थची हत्या स्वप्नीलने केली याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. आता आपण पकडले जाणार, या भीतीने स्वप्नील 16 ऑगस्ट पासून बेपत्ता होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. 18 ऑगस्टला गावातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली.
हे ही वाचा : जगावेगळा मर्डर, नवर्याचा खून करण्यासाठी पत्नीने काय केलं माहित आहे का? पोलिसांचाही विश्वास बसला नाही
advertisement
हे ही वाचा : 'आता, वडील रागावतील', या भीतीने 11 वर्षांच्या मुलीने संपवलं स्वतःला; पण 'त्या'दिवशी काय घडलं होतं?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 20, 2025 8:59 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
जांभळावरून वाद, चुलत भावाची हत्या, पुरावे हाती लागताच आरोपीची आत्महत्या, पण हत्येमागे होतं 'हे' खरं कारण