advertisement

मुंबईकर सावधान! रस्त्यावर थुंकणं, कचरा टाकणं महागात पडणार, नवे नियम पाहिले का?

Last Updated:

Mumbai News: नव्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी धुंकणे, रस्ते व पदपथांवर कचरा टाकणे, सार्वजनिक जागी लघवी किंवा शौच करणे यांसाठी थेट कारवाई करण्यात येईल.

मुंबईकर सावधान! रस्त्यावर थुंकणं, कचरा टाकणं महागात पडणार, नवे नियम पाहिले का?
मुंबईकर सावधान! रस्त्यावर थुंकणं, कचरा टाकणं महागात पडणार, नवे नियम पाहिले का?
मुंबई : रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे किंवा नियमांकडे दुर्लक्ष करणे आता महागात पडणार आहे. शहरातील स्वच्छतेबाबत शिस्त आणण्यासाठी मुंबई महापालिकेने नव्या आणि कठोर नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. सार्वजनिक जागांवरील अस्वच्छतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र उपविधी लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यासाठी स्वतंत्र नियमावली लागू करण्यात आली आहे. तसेच नियम मोडल्यास थेट दंड आकारला जाणार आहे.
‘घनकचरा व्यवस्थापन उपविधी–2025’ लागू
महापालिकेने ‘घनकचरा (व्यवस्थापन व हाताळणी), स्वच्छता आणि स्वच्छताविषयक उपविधी–2025’ जाहीर केले आहेत. या नियमावलीत एकूण 21 ठोस नियमांचा समावेश असून ते शहर व उपनगरांतील सर्व नागरिक, संस्था आणि आस्थापनांवर लागू असणार आहेत.
advertisement
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेला आळा
नव्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, रस्ते व पदपथांवर कचरा टाकणे, सार्वजनिक जागी लघवी किंवा शौच करणे यांसारख्या कृतींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करणे किंवा कपडे धुणे यालाही आळा घालण्यात आला आहे.
ओला-सुका कचरा वर्गीकरण बंधनकारक
घरगुती तसेच व्यावसायिक स्तरावर ओला व सुका कचरा वेगळा करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास दंड आकारला जाणार असून मोठ्या संस्था, व्यापारी संकुले, शैक्षणिक आणि धार्मिक स्थळांनाही ही अट बंधनकारक राहणार आहे.
advertisement
राडारोडा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई
शहरात अनधिकृतपणे राडारोडा टाकणाऱ्यांवर महापालिकेची विशेष नजर राहणार आहे. कुठेही राडारोडा टाकल्यास मोठ्या रकमेचा दंड आकारला जाणार असून विनापरवाना राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर थेट कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेचे नियंत्रण उपायुक्त किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली केले जाणार आहे.
दंडात्मक कारवाईची ठळक तरतूद
नव्या उपविधींनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 250 रुपये, रस्त्यावर कचरा टाकल्यास 500 रुपये, ओला-सुका कचरा वेगळा न केल्यास वैयक्तिक नागरिकांना 200 रुपये तर मोठ्या संस्थांना 1,000 रुपये दंड आकारला जाणार आहे. पाळीव प्राण्यांमुळे सार्वजनिक जागा अस्वच्छ केल्यास 1,000 रुपये, तर व्यावसायिक कारणांसाठी कचरा जाळल्यास 10,000 रुपयांचा दंड निश्चित करण्यात आला आहे.
advertisement
या नियमांची अंमलबजावणी अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे. महापालिकेने नागरिकांना कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, स्वच्छ परिसर राखणे ही प्रत्येक मुंबईकराची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकर सावधान! रस्त्यावर थुंकणं, कचरा टाकणं महागात पडणार, नवे नियम पाहिले का?
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement