advertisement

PAK vs AUS T20 : पाकड्यांनी काढला नवा नियम! कॉनोली Out की Not out? वाद पेटला! Video पाहून धोनीही लावेल डोक्याला हात

Last Updated:

Pakistan Wicketkeeping Video : ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन कूपर कॉनोली याला ज्या पद्धतीने आऊट देण्यात आले, त्यावरून आता नवा वाद उभा राहिला आहे.

Pakistan invented new law for wicketkeeping Khawaja Nafay
Pakistan invented new law for wicketkeeping Khawaja Nafay
PAK vs AUS T20 wicketkeeping : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खळबळ उडवल्यानंतर पाकिस्तानने मॅचमध्ये देखील रडीचा डाव खेळल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानच्या विकेटकीपरने चिटिंग केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 सिरीजमध्ये खराब अंपायरिंगचा स्तर पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. अशातच आता अंपायरच्या कार्यक्षमतेवर आणि पाकिस्तानच्या खेळाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित होताना दिसतायेत.

नेमकं काय घडलं?

सिरीजमधील पहिल्या मॅचमध्ये 14 व्या ओव्हरमध्ये थर्ड अंपायरच्या वादग्रस्त निर्णयानंतर, आता तिसऱ्या टी20 मध्ये मैदानी अंपायरने मोठी चूक केली. या मॅच मध्ये ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन कूपर कॉनोली याला ज्या पद्धतीने आऊट देण्यात आले, त्यावरून आता नवा वाद उभा राहिला आहे. अंपायरने नियमांकडे दुर्लक्ष केल्याने ऑस्ट्रेलियन गोटातून नाराजी व्यक्त केली जात आहे. ऑस्ट्रेलियासमोर 208 रन्सचे मोठे लक्ष असताना त्यांची अवस्था 6 विकेट्सवर 82 अशी बिकट होती.
advertisement

थर्ड अंपायरची मदत न घेताच निर्णय

advertisement
मोहम्मद नवाजच्या ओव्हरमध्ये कॉनोलीने पुढे सरसावत शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल खूप टर्न होऊन लेग साईडच्या दिशेने गेला. पाकिस्तानचा कीपर ख्वाजा नफे याने चपळाईने स्टंपिंग केल्याचे दिसले आणि अंपायरने कॉनोलीला आऊट घोषित केलं. मात्र, रिप्लेमध्ये जे दिसले ते नियमांच्या पूर्णपणे विरोधात होते आणि अंपायरने थर्ड अंपायरची मदत न घेताच हा निर्णय दिला. आयसीसीच्या नियमांनुसार, जोपर्यंत बॉलने किंवा बॉल पकडलेल्या हाताने स्टंप्स उडवले जात नाहीत, तोपर्यंत खेळाडू आऊट मानला जात नाही.
advertisement

ICC चा नियम काय सांगतो? 

दरम्यान, रिप्लेमध्ये स्पष्ट दिसलं की, पाकिस्तानी कीपरने ज्या हातात बॉल पकडला होता, त्या हाताने त्याने स्टंप्स उडवले नव्हते. त्याच्या उजव्या हातात बॉल असताना त्याने डाव्या हाताने स्टंपिंग केले. क्रिकेटच्या नियमांनुसार, फिल्डरच्या ज्या हातात बॉल आहे, त्याच हाताने स्टंप्स उडवणे अनिवार्य असते. पण मैदानी अंपायरने घाईघाईत कॉनोलीला माघारी धाडले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला एक महत्त्वाचा गडी स्वस्तात गमवावा लागला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs AUS T20 : पाकड्यांनी काढला नवा नियम! कॉनोली Out की Not out? वाद पेटला! Video पाहून धोनीही लावेल डोक्याला हात
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement