advertisement

'गोट्याची विकेट पडली पळ', आमदार अमित देशमुखांच्या कारसमोर तरुणाची हत्या, लातूरमधील धक्कादायक प्रकार‍!

Last Updated:

लातूरमध्ये आमदार अमित देशमुख यांची कार एका चौकातून जात असताना तिथे दोन तरुणांनी एका तरुणाची निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
Latur Murder News: "लय दिवसांपासून तू माझ्या डोक्यात बसला आहेस, आज तुझा कायमचा बंदोबस्त करतो," असे म्हणत दोन मित्रांनी एका २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे. प्रज्वल ऊर्फ गोट्या संजय मस्के (२१) असे मृत तरुणाचे नाव असून, रविवारी रात्री उशिरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील लाईफ लाईन हॉस्पिटलसमोर ही घटना घडली.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रज्वल मस्के हा आपला चुलत भाऊ आतिश मस्के याच्यासोबत रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हॉस्पिटलसमोर थांबला होता. यावेळी आनंद नगर भागातील गणेश सुरेश गायकवाड आणि भीमा सूर्यवंशी हे तिथे आले. जुन्या वादाचे निमित्त काढून गणेशने प्रज्वलशी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या गणेशने कमरेला असलेला चाकू काढून प्रज्वलच्या छातीत, पोटात, बरगडीत आणि मानेवर सपासप वार केले.
advertisement
प्रज्वल रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच, 'गोट्याची विकेट पडली, पळ' असे ओरडत आरोपी तिथून पसार झाले. आतिश मस्के याने दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार अमित देशमुखांनी दाखवली तत्परता

ही घटना घडली त्याच वेळी आमदार अमित देशमुख आपली प्रचार सभा आटोपून बाभूळगावकडे जात होते. चौकातील गोंधळ पाहून त्यांनी तातडीने आपली गाडी थांबवली. आमदार गाडीतून उतरत असल्याचे पाहून हल्लेखोर तिथून पळून गेले. देशमुख यांनी तात्काळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रज्वलला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली आणि स्वतः विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपचाराच्या सूचना दिल्या. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान प्रज्वलचा मृत्यू झाला.
advertisement

आरोपींना पहाटे अटक

विवेकानंद चौक पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत पहाटे २.३० वाजता गणेश गायकवाड आणि भीमा सूर्यवंशी या दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून ते नशेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेले कपडे आणि धारदार सुरा जप्त केला आहे.
"आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे, मात्र यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. न्यायालयाकडून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे," अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'गोट्याची विकेट पडली पळ', आमदार अमित देशमुखांच्या कारसमोर तरुणाची हत्या, लातूरमधील धक्कादायक प्रकार‍!
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement