advertisement

Mumbai Local: मुंबईत 238 AC लोकल ट्रेन, 15 डब्याच्या लोकल कधी धावणार? तारीख आली समोर

Last Updated:

Mumbai Local: मुंबईत रोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. याच मुंबईकरांसाठी रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईत 238 AC लोकल ट्रेन, 15 डब्याच्या लोकल कधी धावणार? तारीख आली समोर
मुंबईत 238 AC लोकल ट्रेन, 15 डब्याच्या लोकल कधी धावणार? तारीख आली समोर
मुंबई: नेहमी लोकलच्या गर्दीने हैराण मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मुंबईकरांचा प्रवास अधिक आरामदायी, सुखकर आणि गारेगार होणार आहे. सन 2029 पर्यंत 238 वातानुकूलित लोकल सेवेत दाखल होणार आहेत. तर येत्या जून महिन्यापर्यंत 15 डब्यांच्या लोकल ट्रेन रुळांवरून धावतील. तर मार्च महिन्यापर्यंत दोन सेफ्टी डोअरच्या लोकल ट्रायल बेसिसवर धावणार आहेत.
मुंबईची लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी मानली जाते. परंतु, वाढती गर्दी आणि अपघातामुळे नागरिकांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नुकताच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील रेल्वेचं जाळं मजबूत करण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
advertisement
जूनपर्यंत 15 डब्यांच्या लोकल
मुंबईत रोज लाखो प्रवासी लोकलमधून प्रवास करतात. हीच बाब लक्षात घेऊन 15 डब्यांची लोकल सेवेत आणण्यात येणार आहे. जून महिन्यात ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जून महिन्यापर्यंत 15 डब्यांच्या लोकल धावण्यासाठी फलाट तयार करण्यात येतील. मुंबई मंडळातील 34 रेल्वे स्थानकांमध्ये फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आलं आहे.
advertisement
दरम्यान, रेल्वेच्या पूर्व आणि पश्चिम कनेक्टिव्हिटी स्पेशल कॉरिडॉर अंतर्गत कनेक्ट केलं जाणार आहे. त्यामधून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक देखील वाढवली जाण्याचा प्रयत्न असणार आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत दोन सेफ्टी डोअरच्या लोकल ट्रेन मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील. तसेच 238 एसी लोकल ट्रेन 2029 पर्यंत धावतील. महाराष्ट्रात 132 अमृत भारत स्टेशनची निर्मिती देखील करण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईत 238 AC लोकल ट्रेन, 15 डब्याच्या लोकल कधी धावणार? तारीख आली समोर
Next Article
advertisement
SIM Cardमधून काढलं 26,55, 424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी मार्केटमध्ये झुंबड उडाली, पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो
SIM Cardमधून काढलं 26,55,424 रुपयेचे सोनं; जुन्या सिम कार्डसाठी झुंबड उडाली
  • जुन्या SIM कार्डमधून निघालं सोनं

  • SIM कार्डसाठी लोकांची झुंबड

  • पण एका चुकीने जीवही जाऊ शकतो

View All
advertisement