advertisement

'तेव्हा अजितदादांचं घड्याळ त्यांच्या हातावर नव्हतंच', अमोल मिटकरींच्या दाव्याने पुन्हा खळबळ

Last Updated:

Amol Mitkari on Ajit Pawar plane Accident: अमोल मिटकरी यांनी न्यूज १८ मराठी वाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने विविध प्रश्न उपस्थित केले.

अजित पवार-अमोल मिटकरी
अजित पवार-अमोल मिटकरी
मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून विविध आक्षेप आणि शंका व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक आमदार खासगीत बोलताना दादांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित करीत आहेत. अखेर आमदार अमोल मिटकरी यांनी एक पाऊल पुढे टाकून जाहीरपणे समाज माध्यमांवर दादांच्या मृत्यूबद्दल चौकशी यंत्रणांना प्रश्न विचारले आहेत.
अमोल मिटकरी यांनी न्यूज १८ मराठी वाहिनीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताची वेळ, नियमित वैमानिक नसणे, तसेच अजित पवार यांच्या सोबतीला नियमित लोकांची गैरहजेरी अशा विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. ज्या घड्याळाने अजित पवार यांना राज्यात ओळख मिळाली, त्याच घड्याळाचा आधार घेऊन त्यांचा मृतदेह शोधावा लागेल, असे स्थानिक लोक सांगत होते. मात्र यावरही अमोल मिटकरी यांनी शंका उपस्थित केली.
advertisement

अमोल मिटकरी यांना कोणकोणत्या गोष्टींवर शंका

अमोल मिटकरी म्हणाले, "अजित पवार यांच्या प्रवासासाठी हेच विमान का देण्यात आले? त्यांच्या प्रवासासाठी सुमित कपूर वैमानिक नसतानाही अखेरच्या क्षणी त्यांना पाचारण करण्यात आले. नियमित वैमानिक वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे कपूर यांना बोलविण्यात आल्याचे कारण कंपनीने सांगितले. अपघातावेळी विमानातून दोनदा मोठे आवाज आले. स्थानिक सरपंचांच्या म्हणण्यानुसार या विमानतळावर नेहमी अपघात होतात, परंतु विमानातून येणारा असा आवाज आम्ही पहिल्यांदाच ऐकला. या सगळ्या गोष्टी पाहता शंका घ्यायला वाव आहे"
advertisement

अजितदादांचं घड्याळ त्यांच्या हातावर नव्हतंच!

तसेच अपघात घडल्यानंतर विमानाला आग लागली. लागलेल्या आगीत अजित पवार यांच्यासह बाकी प्रवासी जागेवर मृत पावले. मात्र विमानातील कागदपत्रांना काहीही झाले नाही. तिथल्या माळरानावर विमानातले कागद सगळीकडे पडलेले होते. अजित पवार यांच्या हातात आधी घड्याळ असल्याचे सांगितले गेले. मात्र अजित पवार यांचा मृतदेह ज्यावेळी शवविच्छेदनासाठी नेण्यात आला त्यावेळी त्यांचे घड्याळही दिसले नाही. त्या घड्याळाचे काय झाले हे पुढे सांगायला देखील कुणी तयार नाही, असेही अमोल मिटकरी म्हणाले.
advertisement

आधी सांगितले की धुके होते म्हणून विमानाचे लँडिंग मात्र....

बारामतीत अपघातावेळी धुके होते म्हणून विमानाचे लँडिंग करण्यात आल्याचे आधी सांगण्यात आले. मात्र त्यावेळी लख्ख सूर्यप्रकाश होता, असे स्थानिक लोक सांगतात. मी देखील अपघातस्थळाची पाहणी केली. मलाही तिथे काही शंका घेण्यासारख्या बाबी आढळून आल्याचे मिटकरी म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'तेव्हा अजितदादांचं घड्याळ त्यांच्या हातावर नव्हतंच', अमोल मिटकरींच्या दाव्याने पुन्हा खळबळ
Next Article
advertisement
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; सातवीतल्या मुलाची चटक महागात पडली, कपाट उघडताच पायाखालची जमीन सरकली
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; मुलाची चटक महागात पडली
  • पालकांनो सावधान!

  • तुमच्या मुलाच्या 'खाण्याच्या सवयी' तर घराला कंगाल करत नाहीत ना?

  • 'फ्री मोमोज' आणि 85 लाखांचे दागिने

View All
advertisement